agriculture news in marathi, pink bollworm inspection status, marathwada, maharashtra | Agrowon

बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची गती संथच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची गती संथच आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात अजूनही १ लाख १९ हजार हेक्‍टरवरील नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची गती संथच आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात अजूनही १ लाख १९ हजार हेक्‍टरवरील नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत यंदा १६ लाख ५५ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. त्यापैकी २३ लाखांवर शेतकऱ्यांच्या १६ लाख २७ हजार हेक्‍टरवरील पीकाला बोंड अळीचा फटका बसला. गत आठवड्यापर्यंत बाधित झालेल्या एकूण क्षेत्रापैकी साडेबावीस लाखांवर शेतकऱ्यांच्या १४ लाख ७४ हजार हेक्‍टरवरील नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. जवळपास दीड लाख हेक्‍टरवरील नुकसान झालेल्या कपाशीच्या क्षेत्राचे पंचनामे बाकी होते.

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील १४ लाख ५२ हजार ९७२ शेतकऱ्यांचे १० लाख ६४ हजार हेक्‍टरवरील कपाशी पिकाचे बोंड अळीमुळे नुकसान झाले होते. मागील आठवड्यापर्यंत या तीनही जिल्ह्यांतील जवळपास सव्वा लाख हेक्‍टरवरील पिकाचे पंचनामे बाकी होते. आठवडाभरात त्यापैकी जवळपास सहा ते सात हजार हेक्‍टरवरील नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे झाले. अजूनही या तीन जिल्ह्यांतील १ लाख १९ हजार हेक्‍टरवरील कपाशीचे पंचनामे बाकीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकीकडे संयुक्‍त पंचनामे दुसरीकडे तक्रारीचे पंचनामे या दोन्ही पंचनाम्यांमुळे, कपाशीचे क्षेत्र जास्त असलेल्या या जिल्ह्यांमधील पंचनामे बाकी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीप्रकरणी शासनाने सर्व विभागीय आयुक्‍तांसह जिल्हाधिकाऱ्यांना संयुक्‍त पंचनामे करण्याचे व त्याचा अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. परंतु निर्धारीत वेळेत पंचनामे झालेच नाही. त्यामुळे हे पंचनामे होणार केव्हा, त्यानंतर शासनाने जाहीर केलेली मदत मिळणार केव्हा व कशी हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्‍न अनुत्तरित आहेत.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...