agriculture news in marathi, pink bollworn affected crop area, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात १ लाख ८हजार हेक्‍टर क्षेत्र बोंडअळीग्रस्त
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018
नगर ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापसाच्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्‍यांतील १ लाख ५४ हजार २४२ शेतकऱ्यांचे एक लाख आठ हजार १५७ हेक्‍टर क्षेत्र बोंड अळीमुळे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाने त्या क्षेत्राचे पंचनामे केले आहेत. शेवगाव तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्र आहे.
 
साखर कारखानदारीचा जिल्हा असलेल्या नगरमध्ये आता अकोले वगळता सर्वच्या सर्व तेरा तालुक्‍यांत कापसाचे क्षेत्र वाढू लागल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. 
नगर ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापसाच्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्‍यांतील १ लाख ५४ हजार २४२ शेतकऱ्यांचे एक लाख आठ हजार १५७ हेक्‍टर क्षेत्र बोंड अळीमुळे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाने त्या क्षेत्राचे पंचनामे केले आहेत. शेवगाव तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्र आहे.
 
साखर कारखानदारीचा जिल्हा असलेल्या नगरमध्ये आता अकोले वगळता सर्वच्या सर्व तेरा तालुक्‍यांत कापसाचे क्षेत्र वाढू लागल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. 
नगर जिल्ह्यामध्ये कापसाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात कापसाचे सरासरी साठ हजार हेक्‍टर क्षेत्र होते. मात्र, अलीकडच्या काळात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याने सरासरी क्षेत्र एक लाख हेक्‍टर झाले आहे.
यंदा जिल्हाभरात एक लाख पंचवीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे.
 
सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने लागवड क्षेत्र वाढले असले, तरी नंतरच्या काळात पावसाने दिलेला ताण आणि सरतेशेवटी झालेला जोराचा पाऊस यामुळे नुकसान झाले आणि त्यात पुन्हा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे साधारण साठ ते सत्तर टक्के नुकसान झाले. त्यामुळे पीक घेण्यासाठी झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सुरू झाली. 
 
हिवाळी अधिवेशनातही कापसावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावाचा प्रश्‍न चर्चिला गेला. सदोष बियाण्यांचा विषय पुढे येऊन नुकसानभरपाई देण्याचे सरकारकडून आश्‍वासन मिळाले व सरकारनेही पंचनामे सुरू केले आहेत. जिल्हाभरात आतापर्यंत १ लाख ५४ हजार २४२ शेतकऱ्यांच्या शेतातील १ लाख आठ हजार १५७.३० हेक्‍टर क्षेत्रावरील कापसाचे बोंड अळीने नुकसान झाले असून, या पिकाचे पंचनामे सुरू आहेत.
 
बोंड अळीने बाधित झालेल्या कापसाच्या क्षेत्राचा विचार करता जिल्ह्यामध्ये कापसाच्या नुकसानीतून मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शासनाने प्रतिहेक्‍टर ३६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राला भरपाई देण्यासाठी जिल्ह्याला सुमारे तीनशे नव्वद कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. 
 
पंचनामे झालेले तालुकानिहाय क्षेत्र (कंसात शेतकरी संख्या) : नगर ः३४४५.२२ (४१३५), पारनेर ः १३४.४८ (२३०), पाथर्डी ः २०२१० (३१७३८), संगमनेर ः १०३५.५४ (२५१०), कोपरगाव ः ४६४९.१४ (७०१३), राहाता ः ९२९.७४ (१६२९), श्रीरामपूर ः ४३२१.२० (६१३३), नेवासे ः २१९०६ (३२८५९), राहुरी ः १०२२२ (१६४८५), शेवगाव ः २९४१५.२५ (३३७४०), कर्जत ः ५४८० (६६२६), श्रीगोंदे ः २८०६.३२ (४८४७), जामखेड ः ३६०२.४१ (६२९७).

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...