agriculture news in marathi, pink bollworn on cotton, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीत कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव
अभिजित डाके
बुधवार, 20 डिसेंबर 2017
गेल्या दहा वर्षांपासून कापसाचे पीक घेतोय. यंदा कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पण याबाबत कृषी विभागाने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. कृषी विभागाने पंचनामा करून आम्हाला भरपाई द्यावी.
- कुमार हुरगणी, कापूस उत्पादक शेतकरी, खटाव, ता. मिरज, जि. सांगली.
सांगली ः सांगली जिल्ह्यातील आटपाडी व मिरज तालुक्‍यांतील खटाव या भागातील शेतकरी कापसाची लागवड करतात. जिल्ह्यात अंदाजे ३० ते ४० एकरांवर कापसाची लागवड आहे. विदर्भातील कापसावर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात देखील कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
 
मात्र, जिल्ह्यात कापसाचे अत्यल्प क्षेत्र असल्याने कृषी विभागाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची चर्चा सुरू आहे. कीड बाधित झालेल्या कापसाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 
आटपाडी तालुक्‍यात पूर्वी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड व्हायची. मात्र, बोगस बियाण्यांमुळे तालुक्‍यातील कापसाची लागवड करणे थांबविली आहे. मात्र, आजही या तालुक्‍यात कापसाची लागवड अत्यल्प प्रमाण केली जाते. तसेच मिरज तालुक्‍यातील खटाव या गावातदेखील तीन ते चार वर्षांपूर्वी ३५ हेक्‍टरवर कापसाची लागवड होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बोगस बियाण्यामुळे येथीलही शेतकऱ्यांनी कापूस लागवड थांबविली आहे. असे जरी असले तरी अनेक शेतकरी कापसाची लागवड आजही करताहेत.
 
जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० शेतकरी कापसाचे उत्पादन नेहमीच घेतात. गेल्या वर्षी बियाणे चांगले मिळाले, कोणत्याही कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही, तसेच दरही चांगला मिळाला. जरी या भागात कापसाची बाजारपेठ नसली तरी विजापूर येथील बाजारपेठेचा शेतकरी आधार घेतात. मात्र, यंदाच्या हंगामात कापसाची केवळ वाढच झाली आहे. बोंडे लागली असली तरी त्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहे. त्याच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे.
 
विदर्भात बोंड अळीने कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यात कोणत्या भागात कापसाचे पीक घेतले जाते. किती शेतकरी आहेत, कापसावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे काय  याची माहितदेखील जमा करण्याची तसदी कृषी विभागाने घेतली नाही. कृषी विभागाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा कापूस उत्पादक शेतकरी करू लागला आहे.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...