agriculture news in marathi, pink bollworn on cotton, yeola, maharashtra | Agrowon

येवल्यात १३ हजार हेक्टरवर बोंड अळीचा प्रादुर्भाव
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017
तालुक्यात सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र कपाशी लागवडीखाली आहे. त्यापैकी सुमारे ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बोंड अळीने प्रादुर्भावित आहे. या सर्व पिकाचे पंचनामे वेगाने सुरू असून, अजून चार दिवसांपर्यत हे काम चालणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायकांच्या संपर्कात राहावे.
- जगदीश तुंबारे, मंडल कृषी अधिकारी, येवला.
येवला, जि. नाशिक  : अवर्षण प्रवण असलेल्या येवला तालुक्यात मागील दहा-पंधरा वर्षांपासून हक्काचे पीक म्हणून कपाशीचा पर्याय शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदा मात्र एक तर भाव समाधानकारक नसून त्यातच कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. तालुक्यात तब्बल १३ हजार हेक्टरवरील कपाशीचे क्षेत्र बोंड अळीमुळे बाधित झाल्याने या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे सुरू असले तरी मदत किती मिळणार हे अद्याप गुलदस्तात आहे.
 
मागील वर्षी कपाशीला क्विंटलला सहा हजारांचा भाव मिळाल्याने या वर्षी कोरडवाहू तसेच बागायतदार शेतकऱ्यांनीदेखील कपाशीची लागवड केली; मात्र बाजारपेठेतील धोरणांचा फटका बसून ४५०० ते ४८०० रुपयांपर्यत भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात आहेत. त्यातच कपाशी जोमाने आली असताना सरतेशेवटी जोमदार पिकावर बोंड अळीने हल्ला करून कपाशीचे प्रचंड नुकसान केले. त्यामुळे तब्बल पंधरा हजारांवर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी या नुकसानीबाबत अर्ज भरून दिले असून, कृषी विभागाने गावोगावी शेतातील उभ्या कपाशीचे पंचनामे सुरू केले आहे. तलाठी या पथकाचे अध्यक्ष, ग्रामसेवक सचिव तर कृषी सहायक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहत असून, वेगाने पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीची भरपाई काय व किती मिळणार हे मात्र अद्यापही गुलदस्ताच आहे.
 
पाणीटंचाईमुळे तालुक्यातील शेतकरी कपाशीकडे हक्काचे पीक म्हणून पाहत आहेत. यामुळे कांद्याच्या या आगारात कांद्यानंतर सर्वाधिक क्षेत्रावर कपाशीचे पीक घेतले जात आहे. यंदा मात्र मोठ्या क्षेत्रावरील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यात कपाशीचे उभे फड उद्ध्वस्त झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...