शेती, अन्नपुरवठा साखळीत ५००० कोटींची गुंतवणूक

शेती व अन्नपुरवठा साखळीत पाच हजार कोटींची गुंतवणूक
शेती व अन्नपुरवठा साखळीत पाच हजार कोटींची गुंतवणूक

स्वित्झर्लंडस्थित पायोनियरिंग व्हेंचर्स फंडने भारतात येत्या पाच वर्षांत शेती व अन्नपुरवठा साखळी क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून दहा लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.     ``आतापर्यंत आम्ही भारतात विविध व्हेंचर्ससाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. येत्या पाच वर्षांत हा निधी पाच पटीने वाढविण्याचे आमचे नियोजन आहे. आम्ही शेती, अन्नपुरवठा साखळी आणि इतर उप-पुरवठा साखळींवर लक्ष केंद्रित केले आहे,`` असे `पायोनियरिंग व्हेंचर्स फंड`चे भागीदार पाब्लो इरॅट यांनी सांगितले.   इन्क्युबेटर आणि ॲक्सिलरेटर असे या `फंडा`चे स्वरूप आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत या `फंडा`तर्फे देसाई फ्रुट्स ॲन्ड व्हिजिटेबल्स, सिट्रस इंटरनॅशनल, फार्मलिंक आणि मिल्कलेन या चार कंपन्या सुरू करण्यासाठी मदत करण्यात आली.   नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच इतर कंपन्या ताब्यात घेण्यासाठीही `फंडा`तर्फे गुंतवणूक करण्यात येते. शेती आणि शेतमाल पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम व उत्पादक बनविण्यासाठी वितरण व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे इरॅट यांनी स्पष्ट केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com