agriculture news in marathi, pitrupandharwada in lady finger, gavar vegetabale hike | Agrowon

पितृपंधरवड्यामुळे सोलापुरात भेंडी, गवारला उठाव
सुदर्शन सुतार
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात पितृपंधरवड्यामुळे भेंडी, गवारला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय कोथिंबिर, मेथी, शेपूचे दरही पुन्हा वधारलेले राहिले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात पितृपंधरवड्यामुळे भेंडी, गवारला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय कोथिंबिर, मेथी, शेपूचे दरही पुन्हा वधारलेले राहिले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीची रोज १० ते २० क्विंटल, गवारची १२ ते १५ क्विंटल आवक राहिली. सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. या पंधरवड्यात पूर्वजाप्रती अन्नदान करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये नैवद्यासाठी खास भेंडी, गवारला महत्त्व असते. त्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांचे दर वधारलेले आहेत. मुख्यतः गवार, भेंडीची आवक स्थानिक भागातूनच झाली.

गवारला प्रतिक्विंटलसाठी किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर भेंडीला प्रतिक्विंटल किमान ८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरचीलाही बऱ्यापैकी दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक जेमतेम रोज १० ते ५० क्विंटल इतकी राहिली. पण मागणीच्या तुलनेत आवक कमीच होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.

वांगी, ढोबळी मिरचालाही चांगली मागणी राहिली. त्यांची आवक तुलनेने कमीच होती. वांग्याला प्रतिक्विंटल किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर ढोबळी मिरचीला किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.या सप्ताहात पुन्हा भाज्यांच्या दरात किरकोळ चढ-उतार वगळता दर तेजीत राहिले.

भाज्याही स्थानिक भागातूनच आल्या. मेथी, कोथिंबिर, शेपूच्या मागणी आणि दरात सातत्य राहिले. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ६०० रुपये, कोथिंबिर ५०० ते ६५० रुपये आणि शेपूला २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या आवकेत काहीशी वाढ होते आहे. पण दरामध्ये अद्यापही फारशी सुधारणा झालेली दिसत नाही. कांद्याची आवक स्थानिक भागापेक्षा बाहेरील जिल्ह्यातूनच झाली. कांद्याची आवक  रोज १० ते २० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...