टंचाईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा ः जानकर

टंचाईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा ः जानकर
टंचाईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा ः जानकर

नांदेड ः टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केले.

मुखेड आणि नायगाव खै. तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा श्री. जानकर यांच्या अध्यक्षतेखाली तेथील तहसील कार्यालयात घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.  

बैठकीस आमदार तुषार राठोड, आमदार वसंतराव चव्हाण, डॉ. मिनल पाटील-खतगावकर, दशरथ लोहबंदे, माणिक लोहगावे, व्यंकटराव पाटील-गोजेगावकर, मुखेड नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, उपजिल्हाधिकारी एच. बी. महेद्रकर, पंचायत समिती सदस्य संजय पाटील शेवाळकर, परमेश्वर पाटील, मुखेड तहसीलदार अतुल जटाळे, नायगाव खै. तहसीलदार सुरेखा नांदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड, बी. च. फुफाटे, तालुका कृषी अधिकारी श्री. शितोळे यांची उपस्थिती होती.  

श्री. जानकर म्हणाले, नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विद्युत पुरवठ्याबाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे कमकुवत करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबर दुग्धव्यवसायावरही भर देण्यात यावा, असेही निर्देश श्री. जानकर यांनी बैठकीत दिले.   

श्री. जानकर यांनी मुखेड तालुक्यातील बेरळी, होकर्णा तांडा, होकर्णा, खरपखंडगाव, सलगरा तर  नायगाव खै. तालुक्यातील रातोळी, रातोळी तांडा, आलुवडगाव, टाकळी तमा, मरवाळी तांडा आदी गावांना भेटी देऊन शेतीतील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. या वेळी शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच, कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.     

या बैठकीत मुखेड व नायगाव खै. तालुक्यातील पाणीसाठा, खरीप पेरणीत केलेल्या कामांची माहिती, ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पीक कापणी प्रयोग, खासगी विहीर बोअर अधिग्रहण अहवाल, टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेली गावे, पशुधनासाठी चारा उपलब्धता, मग्रारोहयो अंतर्गत चालू असलेल्या व सेल्फवरील कामांची माहिती, पैसेवारी विद्युत, पाणी प्रश्न, शेत रस्ते, तसेच रिक्त पदांचा आढावा सादरीकरणाद्वारे घेण्यात आला. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, गावातील सरपंच, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com