agriculture news in marathi, Plan the Rabbi with the uncertainty of rain, planning rabbi | Agrowon

पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून रब्बीचे नियोजन करा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

जालना : यंदा रब्बीचे नियोजन करताना पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करूनच नियोजन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. खरपूडी कृषी विज्ञान केंद्रात शुक्रवारी (ता. ५) पार पडलेल्या २५४ व्या मासिक चर्चासत्रात हा सल्ला देण्यात आला.

लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. के. घोडके यांनी जवस लागवडीवर तर बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. जे. ई. जहागिरदार यांनी हरभरा पिकाविषयी मार्गदर्शन केले.

जालना : यंदा रब्बीचे नियोजन करताना पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करूनच नियोजन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. खरपूडी कृषी विज्ञान केंद्रात शुक्रवारी (ता. ५) पार पडलेल्या २५४ व्या मासिक चर्चासत्रात हा सल्ला देण्यात आला.

लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. के. घोडके यांनी जवस लागवडीवर तर बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. जे. ई. जहागिरदार यांनी हरभरा पिकाविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. घोडके म्हणाले, जवसाचा मराठवाड्यासाठी विकसित केलेला लातूर-९३ हा वाण ९० दिवसांत तयार होतो. या वाणाचे कोरडवाहू परिस्थितीत एकरी ३ ते ४ क्‍विंटल तर बागायती परिस्थिती एकरी ७ ते ८ क्‍विंटल उत्पादन मिळते. ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात ३० बाय १० सेंटिमीटर अंतरावर पेरणी करावी. एकरी १० किलो बियाणे वापरावे. जास्त खोल पेरणी करू नये शिवाय फुलोरा अवस्थेत पाणी देण्याचे टाळावे. जवसाचा उपयोग दैनंदिन आहारात चटण्या मसाले, आदी माध्यमातून केला जातो. त्यामधील ओमेगा-३ या प्रथिनास महत्त्व असल्याचेही डॉ. घोडके म्हणाले.

डॉ. जे. ई. जहागिरदार म्हणाले, कोरडवाहू हरभऱ्याची लागवड ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर पाणी उपलब्ध असल्यास उशिरात उशिरा नोव्हेंबरपर्यंत लागवड करता येईल. हरभऱ्याची लागवड जातीपरत्वे ३० बाय १० किंवा ४५ बाय १० सेंटिमीटर अंतरावर करावी. बियाण्यास बुरशीनाशक व जिवाणू खताची प्रक्रिया करावी, शिफारशीप्रमाणे रासायनिक खते व पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. घाटेअळीचे गरजेनुसार एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे. हरभऱ्याच्या बीजोत्पादनाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने यांनी मानले. चर्चासत्राला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...