agriculture news in marathi, Planningूद Maharashtra with Toilets till March 2018 | Agrowon

मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त : लोणीकर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

मुंबई : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन तयार करण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात दिली.

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात ‘गंगा ग्राम स्वच्छता संमेलन’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोणीकर यांनी ही माहिती दिली. या वेळी केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती उपस्थित होत्या.

मुंबई : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन तयार करण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात दिली.

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात ‘गंगा ग्राम स्वच्छता संमेलन’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोणीकर यांनी ही माहिती दिली. या वेळी केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती उपस्थित होत्या.

देशातील हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीच्या संख्येत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. राज्यातील ११ जिल्हे, २०४ तालुके आणि २२,३१० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित जिल्हा, तालुके, ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी सध्या राज्याला एकूण ३६०० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. केंद्राकडून १९८५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करून हा निधी राज्याला लवकरात लवकर मिळाल्यास ग्रामीण महाराष्ट्र पूर्णत: हागणदारीमुक्त होईल, असे लोणीकर यांनी स्पष्ट केले.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्याने २७,९०२ ग्रामपंचायतींमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत पायाभूत सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे सर्व जिल्ह्यांच्या प्रकल्प अंमलबजावणीचा वर्ष २०१४ ते २०१८ पर्यंतचा आराखडा केंद्र शासनास पाठविलेला आहे. या पायाभूत सर्वेक्षणाच्या आधारेच राज्यामध्ये ग्रामीण भागात शौचालय बांधकाम व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

 

इतर बातम्या
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
पुणे जिल्ह्यात रब्बीत अवघे २५ टक्के...पुणे : शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुणे जिल्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
सरपंचांनी कारकीर्दचे स्मरण होईल असे काम...कोल्हापूर : सरपंचांनी नैतिकता जपत निरपेक्ष व...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
बियाणे कंपन्यांत पाकिटावरील...नागपूर : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या...
टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारयवतमाळ : पॉवरग्रीड कंपनीच्या वतीने महागाव, पुसद...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आज उद्‌घाटनमुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा...
मोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे...अमेरिकेतील दक्षिण डाकोटा राज्य विद्यापीठातील...
जमिनीतील जिवाणूंच्या गुणसूत्रीय रचनांचा...जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण...