नगर जिल्ह्यात अकरा तालुक्यांत चारा उत्पादनाचे नियोजन

नगर जिल्ह्यात अकरा तालुक्यांत चारा उत्पादनाचे नियोजन
नगर जिल्ह्यात अकरा तालुक्यांत चारा उत्पादनाचे नियोजन

नगर ः दुष्काळी स्थितीमुळे निर्माण होणाऱ्या चाराटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी वैरण, बियाणे व खतेवाटप योजना सरकारने जाहीर केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘राज्यातील संभाव्य चाराटंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता वैरण, बियाणे व खते वितरण’ योजना जाहीर केली आहे. योजनेतून नगर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्‍यांत २,६८२.३० हेक्‍टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. मात्र, पाणीच नाही तर चारा उत्पादन घेणार कसे, असा प्रश्‍न जिल्हाभरात उपस्थित केला जात आहे.

राज्यात साधारण दोनशे तालुक्‍यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. शेती उत्पादनाला तर फटका बसलणार आहेच; पण जनावरे जगवण्याचा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे राज्यातील १७९ तालुक्‍यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती सरकारने जाहीर केली. त्या तालुक्‍यांत निर्माण होणारी चाराटंचाई कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘राज्यातील संभाव्य चाराटंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता वैरण, बियाणे व खते वितरण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रति दहा गुंठ्यासाठी ४६० रुपयांप्रमाणे बियाणे, खतांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी मका (आफ्रिकन टॉल), ज्वारी (मालदांडी, फुले, रुचिरा, पीकेव्ही क्रांती) या वैरण पिकांचे उत्पादन घ्यायचे आहे. त्यातून मक्‍याच्या दहा गुंठे क्षेत्रातून पाच हजार व ज्वारीचा चार हजार किलो ओला चारा उपलब्ध होईल असा प्रशासन, शासन अंदाज बांधत आहे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एक हेक्‍टर क्षेत्रासाठी चार हजार ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र पाणीच नसेल तर चारा उत्पादन कसे घेणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

पेरणी नियोजन (हेक्‍टर) व उपलब्ध होणारा चारा मेट्रिक टनामध्ये
जामखेड १२७.२ (६३६०)
कर्जत २१७.५ (१०८७५)
नगर २५६.९ (१२८४५)
नेवासा २५४ (१२७००)
पारनेर ३२२.९ (१६१४५)
पाथर्डी २५७ (१२८८०)
राहाता १४७.७ (७३८५)
राहुरी २५१.३ (१२५६५)
संगमनेर ३९६.९ (१९८४५)
शेवगाव १८१.८ (९०९०)
श्रीगोंदा २६८.५ (१३४२५)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com