तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन जिल्ह्यांसाठी मंजूर

खत
खत
परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांसाठी आगामी खरीप हंगामकरिता विविध ग्रेडचा ३ लाख ७२ हजार ६७० टन खत साठा मंजूर करण्यात आला आहे. खताचा वापर करताना नत्र, स्फूरद, पालाश यांचे आदर्श गुणोत्तर राखले जाईल यांची दक्षता घ्यावी. त्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आगामी खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या रासायनिक खतसाठा मंजूर करताना २०१५, २०१६, २०१७  या तीन वर्षांतील हंगामातील खत विक्रीची टक्केवारी तसेच जिल्हानिहाय खत वापर या बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय खत साठा मंजूर करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यासाठी एकूण २ लाख २५ हजार १९० टन साठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया ७६ हजार ३९० टन, सुपर फाॅस्फेट ३६,७६० टन, पोटॅश १९,८३०, डीएपी ३५,९३० टन, एनपीके ५६,२८० टन या खतांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यासाठी एकूण ८९,३६० टन खत साठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया ३३,४९० टन,  सुपर फाॅस्फेट ७,४०० टन, पोटॅश ३,६६० टन, डीएपी १५,०६० टन, एनपीके २९,७५० टन या खतांचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण ५८,१२० टन खत साठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया १७,२६० टन, सुपरा फास्फेट ८,७१० टन, डीएपी १०,८१० टन, एनपीके १७,३४० टन या खतांचा समावेश आहे.
 
खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय मंजूर खतसाठा (टन)
जिल्हा एकूण खतसाठा
नांदेड २,२५,१९०
परभणी ८९,३६०
हिंगोली ५८,१२०.

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com