agriculture news in marathi, planning for legislative assembly session, nagpur, maharashtra | Agrowon

सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची जय्यत तयारी
नीलेश डोये
सोमवार, 2 जुलै 2018

नागपूर  : बुधवारपासून (ता. ४) सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी आयुधे परजली असून केवळ तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनासाठी १५ हजारांवर तारांकित प्रश्‍न व अडीच हजारावर लक्षवेधी सूचना विधिमंडळ सचिवालयाकडे दिल्या आहेत.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विभागाला विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांकडून एकूण अडीच हजारावर लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक लक्षवेधी सूचना या विधानसभेच्या सदस्यांकडून सादर झाल्या आहेत.

नागपूर  : बुधवारपासून (ता. ४) सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी आयुधे परजली असून केवळ तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनासाठी १५ हजारांवर तारांकित प्रश्‍न व अडीच हजारावर लक्षवेधी सूचना विधिमंडळ सचिवालयाकडे दिल्या आहेत.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विभागाला विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांकडून एकूण अडीच हजारावर लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक लक्षवेधी सूचना या विधानसभेच्या सदस्यांकडून सादर झाल्या आहेत.

विधिमंडळाच्या चार जुलैपासून उपराजधानीत सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी २७ जूनपासून लक्षवेधी सूचना स्विकारण्याला सुरवात झाली. विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांकडून अशा एकूण अडीच हजारावर लक्षवेधी सूचना संबंधित खात्याला सादर झाल्या आहेत. ही संख्या पुढे आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

तातडीच्या जनहिताच्या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी सूचना विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या सभागृहात मांडता येतात. विधानसभा व विधान परिषद सदस्यांनी जवळपास १५ हजारांवर तारांकित प्रश्‍न दिले आहेत. विधिमंडळ कामकाज समितीने आखलेल्या कामकाजानुसार विधिमंडळाच्या केवळ १३ बैठका होणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नागपुरातील कायदा व सुव्यवस्था या प्रश्‍नांवर विरोधक आक्रमक राहण्याची शक्‍यता आहे. या काळात या प्रश्‍नांपैकी किती प्रश्‍नांची तड लागेल, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...