agriculture news in marathi, planning meeting, akola, maharashtra | Agrowon

मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर दुष्काळाबाबत धोरण ठरवू ः मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाकडे ७ हजार कोटींचा प्रस्ताव दिला अाहे. केंद्र सरकारच्या निकषांत न बसणारी मंडळे राज्याने वस्तुस्थिती पाहून दुष्काळी जाहीर केली आहेत. त्यांना राज्य शासनाच्या निधीतून मदत केली जाईल. याशिवाय अनेक भागांतून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात अाहे, त्यासाठी मदत व पुनर्वसन समिती स्थापन केली असून, या समितीच्या अहवालानंतर दुष्काळाबाबत धोरण ठरवू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाकडे ७ हजार कोटींचा प्रस्ताव दिला अाहे. केंद्र सरकारच्या निकषांत न बसणारी मंडळे राज्याने वस्तुस्थिती पाहून दुष्काळी जाहीर केली आहेत. त्यांना राज्य शासनाच्या निधीतून मदत केली जाईल. याशिवाय अनेक भागांतून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात अाहे, त्यासाठी मदत व पुनर्वसन समिती स्थापन केली असून, या समितीच्या अहवालानंतर दुष्काळाबाबत धोरण ठरवू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (ता. १४) अकोला जिल्ह्यातील विकासकामे, योजनांची अंमलबजावणी, दुष्काळी परिस्थितीसह विविध विषयांचा अाढावा घेतला. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोदे, खासदार संजय धोत्रे, अामदार प्रकाश भारसाकडे, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, गोपिकिशन बाजोरीया, प्रवीण परदेशी, विभागीय अायुक्त पीयूष सिंग, जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्यासह इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की अकोला जिल्ह्यात पाऊस चांगला झाला. मात्र खंडाचे प्रमाण अधिक असल्याचा फटका बसला. केंद्राच्या निकषानुसार शासनाने पाच तालुके दुष्काळी जाहीर केले. अाणखी काही ठिकाणांवरून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात अाहे. ही बाब लक्षात घेता वस्तुस्थिती पाहण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाची समिती गठीत केली अाहे. प्रत्यक्ष पाहणी करून ही समिती अहवाल देईल. त्यानुसार जेथे गरज असेल अशा ठिकाणी दुष्काळाबाबत धोरण ठरवू, असेही त्यांनी सांगितले.

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १७०० शेततळी पूर्ण झाली असून राहिलेले शेततळे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे कृषी विभागाला निर्देश दिले अाहेत. सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५१२ अर्ज अाले होते. त्यांना मान्यता दिली असून सात हजार शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले अाहे. बोंड अळीने नुकसान झालेल्या एक लाख २३ हजार शेतकऱ्यांना शासनाने तीन टप्प्यात १३५ कोटींचा निधी दिला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमा केला. तूर खरेदीपोटी ११५ कोटी, हरभरा खरेदीचे ४२ कोटी ७२ लाख देण्यात अाले. अाधारभूत किमत योजनेअंतर्गत धान्य खरेदीत भ्रष्टाचार करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील संस्थेविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.    

‘सर्व प्रकल्प पूर्ण करणार’
अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांना बळिराजा अभियानातून निधी दिला अाहे. नेरधामणा प्रकल्पाचे जून २०१९ पर्यंत घळभरणीचे उद्दिष्ट ठेवले अाहे. पूर्णा नदीवर असलेल्या घुंगशी व इतर बॅरेजेसची कामे पूर्ण होत अाली अाहेत. जी अपूर्ण अाहेत ती वेळेत पूर्ण करण्याचे सांगण्यात अाले. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत धोरण स्पष्ट अाहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात शासनाच्या रस्ते विकास, जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरप्रकार होत असल्याची एकही तक्रार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.    
 
‘राज्य मागास अायोगाचा अहवाल फुटला नाही’

मराठा अारक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जाणारा राज्य मागास अायोगाचा अहवाल अाल्यानंतर पुढील १५ दिवसांत वैधानिक कारवाई पूर्ण केली जाईल. या महिनाअखेर हा विषय संपलेला असेल. हा अहवाल अद्याप माझ्यापर्यंत पोचलेला नाही. शिवाय तो फुटलासुद्धा नाही. काहींनी या अफवा पसरविल्या अाहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...