परभणी विभागात महाबीजचे ३० हजार हेक्टरवर बीजोत्पादन

सोयाबीन
सोयाबीन

परभणी : महाबीजच्या परभणी विभागांतर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्माबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये ३० हजार ८७८ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे, असे महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी सांगितले.

महाबीजतर्फे दरवर्षी खरिपातील सोयाबीन, मूग, उडिद, तूर पिकांच्या पायाभूत तसेच प्रमाणित बियाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. यंदा सोयाबीनच्या एमएयूस- ७१, एमएयूएस -१५८, एमएयूएस १६२, जेएस-३३५, फुले अग्रणी,एमएसीसीएच-११८८, डीएस-२२८ तुरीच्या बीडीएन -७११, बीएसएमआर -७३६, आयसीपीएल -८७, मुगाच्या कोपरगांव, उत्कर्षा, बीएम-२००२-१, बीएम-२००३-२, उडिदाच्या टीयु-१, तागाच्या जेआरओ-५२४, बाजरीच्या धनशक्ती, कपाशीच्या एनएच -६१५ या वाणांच्या पायाभूत तसेच प्रमाणित बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

सर्व पिकांचे मिळून एकूण ३ लाख ४५ हजार क्विंटल बीजोत्पादनाचे उद्दिष्ट आहे, असे श्री. गायकवाड यांनी सांगितले.  

जिल्हानिहाय बीजोत्पादन कार्यक्रम क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा क्षेत्र
परभणी १०,५४६
हिंगोली  ७५७०
नांदेड २३३८
लातूर ६३७६
उस्मानाबाद ३५७८
सोलापूर ४७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com