agriculture news in marathi, planning starts for selfi with farmer program, yavatmal, maharashtra | Agrowon

‘सेल्फी वुईथ फार्मर’साठी यवतमाळ कृषी विभागाची तयारी सुरू
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

यवतमाळ  : सध्या पेरणी हंगाम सुरू झाला आहे. या वेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व पेरणी करतानाचा फोटो घ्यावा, अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नुकत्याच कृषी विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागात आता ‘सेल्फी विथ फार्मर’ची तयारी सुरू झाली आहे. यात प्रत्येक कर्मचाऱ्याकडे एक गाव दिले जाणार आहे.

यवतमाळ  : सध्या पेरणी हंगाम सुरू झाला आहे. या वेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व पेरणी करतानाचा फोटो घ्यावा, अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नुकत्याच कृषी विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागात आता ‘सेल्फी विथ फार्मर’ची तयारी सुरू झाली आहे. यात प्रत्येक कर्मचाऱ्याकडे एक गाव दिले जाणार आहे.

पेरणी हंगामात शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांनी आणलेले बियाणे, खते यांची तपासणी व गुणवत्ता तपासावी शिवाय कृषी विभागाचे अधिकारी बांधावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारेल, या हेतूने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘सेल्फी विथ फार्मर’ असा फोटो काढण्याची सूचना दिली. त्याअनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कामाला लागले आहे.

जिल्ह्यातील सर्व कृषी कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली असून, प्रत्येक कर्मचाऱ्यास गाव आणि दिनांक याचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे. त्या तारखेला त्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला दिलेल्या गावात जाऊन शेतकऱ्यांची भेट घ्यावी लागणार आहे.

याशिवाय पेरणी करतानाचे फोटो घ्यावयाचे आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच कृषी अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर दिसणार आहेत. या ठिकाणी नुसता फोटो काढावयाचा नसून, शेतात कामही करावे लागणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयात बसून असलेल्या कर्मचाऱ्यांना नाइलाजाने का होईना, शेतात जाऊन प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी उपस्थित राहावे लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...