agriculture news in marathi, Planting fodder to complete the scarcity | Agrowon

चाराटंचाई संपविण्यासाठी चारा लागवड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

जिल्ह्यात अंदाजे १४ लाख मेट्रिक टन एवढा चारा उपलब्ध आहे. तो मार्चपर्यंत पुरेल. चारा लागवडीसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे पशुसंवर्धन विभागाला ५० लाख रुपये देण्यात येतील. त्यापैकी ३५ लाख रुपयांचे वितरण झाले आहे. बियाणे वाटप व खत वाटपही होईल.
          - डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या कमी पाऊसमानामुळे यंदा दुष्काळाची स्थिती गंभीर झाली आहे. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी या संभाव्य चाराटंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, आत्मा व कृषी विभागाने खास चारा लागवड मोहीम आखली असून, जिल्ह्यात १५०० एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय ‘आत्मा''मार्फत काही शेतकरी गट, कंपन्या यांच्या मदतीने हा कार्यक्रम व्यापक स्तरावर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी मका, ज्वारी, नेपिअरच्या बेण्याची निवड चारा लागवडीसाठी करण्यात आली आहे. ‘आत्मा''च्या माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार ५०० एकरांवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आफ्रिकन टॉल जातीच्या मक्‍याची लागवड ७५० एकरांवर आणि मालदांडी ज्वारीची लागवड ७५० एकरांवर अशी केली जाणार आहे.

पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने बियाणे, खते पुरविली जाणार आहेत. तालुका बीज गुणन क्षेत्रावर नेपिअर जातीच्या ठोंबाची लागवड केली जाणार आहे. या ठोंबापासून होणाऱ्या चाऱ्याचे वाटप लगतच्या शेतकऱ्यांना होईल.

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...