agriculture news in marathi, Planting fodder to overcome the scarcity | Agrowon

नगर जिल्ह्यात टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवड
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

नगर : यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. आगामी काळात जनावरांचे हाल होऊ नये, यासाठी राज्यातील नगरसह १० जिल्ह्यांत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या ७५० हेक्‍टर क्षेत्रावर अतिरिक्त चारा लागवड करण्यात येणार आहे. त्यातून साधारण १० हजार टन हिरवा चारा उपलब्ध होईल.

नगर : यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. आगामी काळात जनावरांचे हाल होऊ नये, यासाठी राज्यातील नगरसह १० जिल्ह्यांत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या ७५० हेक्‍टर क्षेत्रावर अतिरिक्त चारा लागवड करण्यात येणार आहे. त्यातून साधारण १० हजार टन हिरवा चारा उपलब्ध होईल.

पावसाने दडी मारल्याने खरीप वाया गेला. रब्बीवरही संकट आहे. राज्यात सुमारे दिडशेच्यावर तालुक्‍यांत टंचाईचे सावट आहे. त्यामुळे यंदा राज्यातील बहूतांश गावांना चारा टंचाई सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या पुढाकारातून चारा उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी ११ ऑक्‍टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टंचाई स्थितीचा आढावा घेतला. चाऱ्याअभावी पशुधनाचे हाल होऊ नयेत, याची पूर्वतयारी म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नगर जिल्ह्याच्या विचार करता यंदा सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी शासनाने चारा उत्पादन करण्यासाठी पायलट प्रोजेक्‍ट हाती घेतला आहे. त्यानुसार कोपरगाव येथील पशुधन विकास महामंडळाच्या १०० एकरांवर चारा लागवड करण्यात येईल. जिल्ह्यातील विविध भागातही चाऱ्याची लागवड केली जाणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.

विविध बियाण्यांची लागवड
दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी पुरेसा चारा उपलब्ध करण्यात येणार आहे. यात उपलब्ध क्षेत्रांपैकी ५० टक्के क्षेत्रावर ज्वारीच्या मालदांडी, फुले, रुचिरा, पीकेव्ही क्रांती या बियाण्यांची लागवड केली जाणार आहे. २५ टक्के क्षेत्रात मकाचे आणि उर्वरित २५ टक्के क्षेत्रामध्ये न्यूट्रिफीड चारा पिकांची लागवड केली जाणार आहे. चारा हाती आल्यावर त्याचा मुरघास केला जाईल. शिवाय सध्याच्या स्थितीत नैसर्गिकरीत्या त्या प्रक्षेत्रावरील गवत कापून जपून ठेवण्याचेही आदेश दिले आहेत.

असे असेल जिल्हानिहाय क्षेत्र (हेक्‍टर)
महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ
कोपरगाव (नगर) ४०
हिंगोली १००
पोहरा (अमरावती) ५०
जत (सांगली) १००
जुनोनी (सोलापूर) २०
ताथवडे (पुणे) ४०
वडसा (गडचिरोली) १००
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेळी, मेंढी विकास महामंडळ
महुद (सोलापूर) १००
रांजणी (सांगली) १००
पडेगाव (औरंगाबाद) ३०
पोहरा (अमरावती) ३०
अंबेजोगाई (बीड) २०
बोंद्री (नागपूर) १०

 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...