agriculture news in marathi, Planting of mulberry in 255 hectares in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात तुतीची २५५ हेक्टरवर लागवड
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पुणे ः शाश्वत आणि अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम उद्योगाकडे कल वाढत आहे. मात्र, दरवर्षी कमी पडत असलेल्या पावसाचा फटका तुती लागवडीला बसत आहे. चालू वर्षी जिल्ह्यात तुती लागवडीचे ७०० एकराचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ४५५ शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने प्रशासकीय मंजुरी दिली असून, सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यात २२६ शेतकऱ्यांनी २५५ एकरावर तुती लागवड केल्याचे चित्र आहे.

पुणे ः शाश्वत आणि अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम उद्योगाकडे कल वाढत आहे. मात्र, दरवर्षी कमी पडत असलेल्या पावसाचा फटका तुती लागवडीला बसत आहे. चालू वर्षी जिल्ह्यात तुती लागवडीचे ७०० एकराचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ४५५ शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने प्रशासकीय मंजुरी दिली असून, सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यात २२६ शेतकऱ्यांनी २५५ एकरावर तुती लागवड केल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तुती लागवडीसाठी राबविण्यात आलेल्या महारेशीम अभियानाअंतर्गत ३१७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. जिल्ह्यात यापूर्वी जवळपासून ७०० एकरांहून अधिक क्षेत्रावर तुती लागवडी झालेल्या आहेत. गेल्या वर्षीही सुमारे १९० एकरावर तुती लागवड झाली आहे.
चालू वर्षी कमी पाऊस असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ एकराने अधिक लागवड झाली. मात्र जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात अधिक पाऊस झाला असता तर या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता होती.

पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, इंदापूर ही तालुके रेशीमसाठी तुतीचे हब म्हणून ओळखली जातात. यंदाही जिल्ह्यात तुती लागवडीचे सुमारे ७०० एकराचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा रेशीम कार्यालयाकडून शेतकऱ्यांना लागवडीसाठी तुती बेण्याचे नियोजन करण्यात आले; तसेच नर्सरीतील रोपे उपलब्ध करून देण्याचे नियोजन जिल्हा रेशीम कार्यालयाच्या पातळीवरून केले होते. शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळविण्याच्या उद्देशाने मनरेगा योजनेतून तुती लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

चालु वर्षी सुमारे ७०० एकराचे तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. चांगला पाऊस झाला असता तर मोठ्या प्रमाणात लागवड झाली असती. कमी पावसामुळे अडीचशे एकरावर लागवड झाली आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- पी. एस. गणाचार्य, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, पुणे

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...