हिंगोली जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर हळद लागवड

हिंगोली जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर हळद लागवड
हिंगोली जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर हळद लागवड

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात यंदा ३५ हजार २०१ हेक्टरवर हळद लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळद लागवड क्षेत्रात ९ हजार ६४९ हेक्टरने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी सुधारित लागवड तंत्राचा अंगीकार केल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. अन्य पिकांपेक्षा उत्पन्नाची खात्री असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा हळदीकडे वाढला आहे.

विविध कारणांनी कापूस, मूग, उडीद आदी पारंपरिक पिकांपासून उत्पन्नाची खात्री नसल्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीकडे वळत आहेत. त्यामुळे हळद लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. काही वर्षांपूर्वी बागायती तालुका म्हणून ओळख असलेल्या वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचा केळी, ऊस, कापूस या पिकांवर भर असे. राज्यातील केळी उत्पादक तालुका म्हणून वसमतची ओळख होती, परंतु अनियमित, अपुऱ्या पावसामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे केळी, ऊस लागवडीवर मर्यादा आल्या, तर कपाशीवर बोंड अळी येत असल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

किफायतशीर खर्चात उत्पन्नाची खात्री असलेल्या हळदीला शेतकरी पसंती देत आहेत. त्यामुळे वसमतची ओळख आता हळद उत्पादक तालुका अशी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात हिंगोली, वसमत, जवळाबाजार, औंढा आदी ठिकाणच्या बाजार समित्याअंतर्गत हळद मार्केट विकसित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी हळद लागवडीवर भर देत आहेत. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात १६ हजार ४४२ हेक्टरवर हळद लागवड करण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com