agriculture news in marathi, plastic milk bags policy not cleared | Agrowon

दूध पिशव्यांचे धोरण अधांतरीच !
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई : ‘आरे’वगळता दूध पुरवठादारांनी ग्राहकांकडून पिशव्या परत घेण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे सहकारी आणि खासगी दूध संघांनी अजूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या फेरवापराबाबत कार्यवाही सुरू केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या धोरणावरच दूध संघ कृती समितीने आक्षेप नोंदवला आहे.

मुंबई : ‘आरे’वगळता दूध पुरवठादारांनी ग्राहकांकडून पिशव्या परत घेण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे सहकारी आणि खासगी दूध संघांनी अजूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या फेरवापराबाबत कार्यवाही सुरू केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या धोरणावरच दूध संघ कृती समितीने आक्षेप नोंदवला आहे.

प्लॅस्टिकबंदीतून दुधाच्या पिशव्यांना वगळण्यात आले आहे; मात्र या पिशव्या ग्राहकांकडून परत घेऊन त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहील. सरकारच्या या आदेशाची सुरवात सरकारी दूध वितरक कंपनी ‘आरे’ने केली आहे. ग्राहकाकडून अतिरिक्त ५० पैसे वसूल करण्यात येणार आहेत. ग्राहकाने ही पिशवी परत केल्यानंतर पैसे परत मिळणार आहेत, असा नियम ‘आरे’ने केला आहे. त्यासाठी प्रत्येक पिशवीची नोंद ठेवण्यात येत आहे. इतर दूध पुरवठादारांनी या प्रक्रियेला अद्याप सुरवात केलेली नाही. दुधाचे वितरण पूर्वीसारखेच सुरू आहे. विक्रेत्यांनीही अतिरिक्त ५० पैसे अनामत घेतलेली नाही. ग्राहकाकडून ५० पैसे घेऊन ते नंतर परत करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असा दावा कृती समितीने केला आहे.

दुधाची पिशवी ५० मायक्रॉनपेक्षा जाड आहे. तूर्तास दूध वितरणाची व्यवस्था पूर्वीसारखीच सुरू आहे. ५० पैसे आकारून त्याचा परतावा देणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही.
- विनायक पाटील, 
अध्यक्ष, सहकारी व खासगी दूध संघ कृती समिती

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...