agriculture news in marathi, Please tell the Mayabap government to do something | Agrowon

दुष्काळ जाहीर केलाय म्हणे; पण आमच्या पोतर अजून तर काही आलं नाही
सूर्यकांत नेटके
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नगर : ‘औंदा पाऊस नाही, उसनवार करून लावलेल्या कपाशी, तुरीची वाट लागली; पण ती पिकं हातची गेली, गुरंढोरं जगायची चिंता, प्यायला पाणी नाही. आता जगायचे वांधे झालेत, सरकारने दुष्काळ जाहीर केलाय म्हणे; पण आमच्या पोतर अजून तर काही आलं नाही. साहेब तुम्ही तरी मायबाप सरकारला चांगलं काही तरी करायला सांगा. सरकारनं आधार दिला नाही, तर जनावराचं काय, माणसं बी जगत्याल का नाही, हे सांगता येत नाही.’ दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता असलेला नगर जिल्ह्यामधील शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यातील नागरिकांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर आपल्या व्यथा मांडताना हतबलता व्यक्त केली.

नगर : ‘औंदा पाऊस नाही, उसनवार करून लावलेल्या कपाशी, तुरीची वाट लागली; पण ती पिकं हातची गेली, गुरंढोरं जगायची चिंता, प्यायला पाणी नाही. आता जगायचे वांधे झालेत, सरकारने दुष्काळ जाहीर केलाय म्हणे; पण आमच्या पोतर अजून तर काही आलं नाही. साहेब तुम्ही तरी मायबाप सरकारला चांगलं काही तरी करायला सांगा. सरकारनं आधार दिला नाही, तर जनावराचं काय, माणसं बी जगत्याल का नाही, हे सांगता येत नाही.’ दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता असलेला नगर जिल्ह्यामधील शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यातील नागरिकांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर आपल्या व्यथा मांडताना हतबलता व्यक्त केली.

नगर जिल्ह्यामधील शेवगाव, पाथर्डी, जामखेड आणि कर्जत तालुक्‍यातील गावांत बुधवारी (ता. ५) केंद्रीय पथकाने परिस्थितीची पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातून हे पथक दुपारी उशिरा नगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्‍यातील कऱ्हेटाकळी येथे आले. तेथे त्यांनी पाहणी करून तळणी येथील वयोवृद्ध शेतकरी विष्णू सातपुते यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर हे पथक बेलगावला गेले. तेथे पथकातील केंद्रीय भारतीय खाद्य निगमचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक एम. एच. टेंभुर्णे व विजय ठाकरे यांनी सारंगधर आनंतपुरी, रामनाथ घनवट, रमेश पोकळे, अंबादास तनपुरे या शेतकऱ्यांच्या शेतात कपाशी व तुरीची पाहणी केली. त्या वेळी काही शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांचे अक्षरशः पाय धरून आपल्या व्यथांना मोकळी वाट करून दिली. शेवगावांत धावती पाहणी करून पथक पाथर्डी तालुक्‍यातील रांजणीत पोचले.

जनावरांचा चारा आणि हाताला काम नाही. कसं जगणार?...मायबाप सरकारनं आमच्याकडे पाहावं...,’ अशी विनवणी तालुक्‍यातील रांजणी येथील साठ वर्षांच्या चतुराबाई घोडके या शेतकरी महिलेने केंद्रीय पथकासमोर मांडली. पथकाने कोरड्या पडलेल्या शिरसाटवाडी पाझर तलावाची पाहणी केली. केळवंडी येथील चतुराबाई घोडके यांच्या शेतातील बाजरी व कपाशीच्या शेताला भेट दिली. अंबादास घोडके, बाबासाहेब घोडके व प्रभुनाथ घोडके हे शेतकरी उपस्थित होते. पथकाने केळवंडी येथील रामदास कोठे यांच्या पाण्याअभावी जळून चाललेल्या कांद्याच्या शेताची पाहणी केली. पाथर्डी तालुक्‍यातून हे पथक जामखेड तालुक्‍यातील आरणगावला तीन तास उशिरा पोचले. येथील मारुती शिंदेंच्या शेतातील जळालेल्या लिंबाच्या बागेची, कापूस व तुरीच्या पिकाची पाहणी केली आणि पंधरा मिनिटांत पथक आरणगावला गेले. येथील युवक अंकुश शिंदे यांच्याशीही संवाद साधला. धावत्या भेटीनंतर पथक कर्जत तालुक्‍यातील टाकळी खांडेश्‍वरीत पोचले. तेथे पवार वस्तीवर भेट देऊन पाहणी केली. माहिजळगावला लोक थांबले होते, मात्र पथक तेथे थांबले नाही. नगर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी हतबलता व्यक्त केली. पथकासमवेत कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

राज्य व केंद्र सरकारने दुष्काळाचे संकट गांभीर्याने घेतलेले आहे. राज्य सरकारने सात हजार कोटींचा आराखडा तयार करून केंद्राला पाठविला आहे. आता केंद्राच्या पथकाने पाथर्डीतील शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी येथे पाहणी केली आहे. जनावरांना छावण्या व फळबागांना अनुदान, रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्यासंबंधीचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत.
- राम शिंदे, पालकमंत्री

पाथर्डी-शेवगावमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पथकाने दुष्काळाची पाहणी केली. राज्य सरकार जनतेच्या सोबत आहे. टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जनतेला दुष्काळात मदत करण्याचे आमचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून दुष्काळासाठीचा निधी आणून पिण्याच्या पाणीयोजना मार्गी लावू.
- मोनिका राजळे, आमदार, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ

 

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...