पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर

पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली असून, त्यांनी केरळसाठी 500 कोटींची तत्काळ मदत जाहीर केली.  केरळमधील पुरात आत्तापर्यंत 324 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोचीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हवाई पाहणी करत पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल पी. सथासिवम आणि केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्सो यांनी हवाई पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख तर यातील गंभीर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली. यापूर्वी 100 कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता 500 कोटींची मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, केरळच्या या पुरपरिस्थितीच्या बचावकार्यासाठी तिन्ही संरक्षण दले, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान दाखल झाले आहेत. राज्यात नौदलाच्या 42 तर लष्कराच्या 12 तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com