agriculture news in marathi, PM Modi criticizes Congress as DealParty | Agrowon

काँग्रेस ना दिलवाली ना दलितवाली, केवळ 'डील'वाली : पंतप्रधान मोदी
वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

चित्रदुर्ग, कर्नाटक : ‘काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती, ती दलितवालीही नव्हती, ती केवळ ‘डील’वाली होती, जो पक्ष गरिबांचे भले करू शकत नाही त्या पक्षाला हद्दपार करण्याची वेळ आली आहे,’’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर येथे रविवारी (ता.६) केला आहे. 

चित्रदुर्ग, कर्नाटक : ‘काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती, ती दलितवालीही नव्हती, ती केवळ ‘डील’वाली होती, जो पक्ष गरिबांचे भले करू शकत नाही त्या पक्षाला हद्दपार करण्याची वेळ आली आहे,’’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर येथे रविवारी (ता.६) केला आहे. 

चित्रदुर्ग येथील प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. काँग्रेसने डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अपमान केला आहे. काँग्रेसच्या काळात भारतरत्न हा पुरस्कार केवळ एका घरासाठी राखीव होता, म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना पुरस्कार देण्यात आला नाही, ते काम आम्ही केले. तसेच, थोर वीरा मरकडी यांच्याकडून साहस आणि शौर्य शिकण्याची गरज आहे. त्याही दलित समाजातच जन्माला आल्या होत्या, असेही मोदी या वेळी म्हणाले. त्याचबरोबर, काँग्रेस वीरा मरकडी यांची जयंती साजरी करताना कधी दिसत नाही उलट ते मतांसाठी सुलतानाची जयंती साजरी करण्यासाठी पुढे येतात, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. भाजप आणि काँग्रेसदरम्यान एकमेकांवरती आरोपाच्या फैरी झडत आहेत. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...