agriculture news in marathi, PM silence on rate hike and unemployment, Maharashtra | Agrowon

दरवाढ, बेरोजगारीवर पंतप्रधानांचे मौन : राहूल गांधी
वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली: भाजप म्हणत होते ७० वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखविले. ते खरेच ठरले आहे. आता प्रत्येक नागरिक एकमेकांशी लढत आहे. जाती-जातींत भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडले. सिलिंडरचे दर चारशे रुपयांवरून आठशेवर गेले आहेत. देशाला जी गरज आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलत नाहीत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

नवी दिल्ली: भाजप म्हणत होते ७० वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखविले. ते खरेच ठरले आहे. आता प्रत्येक नागरिक एकमेकांशी लढत आहे. जाती-जातींत भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडले. सिलिंडरचे दर चारशे रुपयांवरून आठशेवर गेले आहेत. देशाला जी गरज आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलत नाहीत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर सर्व विरोधकांनी सोमवारी (ता. १०) भारत बंदची हाक दिली. सतत वाढणाऱ्या पेट्रोलच्या किमतींवरून मोदी सरकारला लक्ष्य करत काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी बंद पुकारला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाट येथे जाऊन दर्शन आंदोलनाला सुरवात केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शरद यादव आदी विरोधी पक्षांचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. 

राहुल गांधी म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील जनतेला, युवकांना, शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. कोठेही गेले तरी आश्वासने देत होते. चार वर्षे झाली, लोकांना आता दिसायला लागले आहे, भाजपने काय करून ठेवले होते.  शेतकऱ्यांना, बेरोजगारांना मार्ग दिसत नाही. फक्त काही उद्योगपतींना मार्ग मोकळे करून दिले आहेत. पंतप्रधानांनी नोटाबंदी करून तुमचे पैसे लुटले. नोटाबंदी का केली हे अजूनही देश समजू शकला नाही. माध्यमांना आजकाल मोकळेपणाने लिहिता येत नाही. पण, देशातील जनता तुमच्यासोबत आहे. तुम्ही मोकळेपणाने लिहा, कोणाला घाबरू नका.’’ 

डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, की सतत वाढणाऱ्या इंधन किमतींचा फटका या सरकारला पुढील निवडणुकीत पाहायला मिळेल. मोदी सरकारला किमतीत वाढ करण्यात रस आहे, देशहिताशी त्यांना काही देणेघेणे नाही. आता हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे. 

शरद पवार म्हणाले, की केंद्र सरकार इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे सरकार सर्व आघाड्यांवर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे.

दर नियंत्रण सरकारच्या हातात नाही ः प्रसाद
इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे हे सरकारच्या हातात नाही. आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर हे तेल कंपन्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत. तसेच, ही बाब देशाच्या जनतेला ठाऊक आहे म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या बंदला प्रतिसाद दिलेला नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हात झटकले. काँग्रेसच्या आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इतर अॅग्रो विशेष
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...