Agriculture News in Marathi, point of sale machine shortage, kolhapur district | Agrowon

रब्बीच्या तोंडावर ई-पॉस मशिनचा तुटवडा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017
कोल्हापूर : जिल्ह्यात अद्यापही ई-पॉस मशिनची उपलब्धता न झाल्याने ज्या विक्रेत्यांना हे मशिन मिळाले नाहीत; त्यांना खताची विक्री करणे अडचणीचे झाले आहे. या मशिनशिवाय खतविक्री करू नये, असा अादेश शासनाने काढल्याने विक्री कशी करायची, या चिंतेत खत उत्पादक आहेत. 
 
पहिल्या टप्प्यात म्हणजे चार महिन्यांपूर्वी एकूण विक्रेत्यांच्या फक्त पन्नास टक्के पॉस मशिनची उपलब्धता विक्रेत्यांना झाली. सुरवातीच्या टप्प्यात ही यंत्रणा कशी हाताळायची, याची माहिती नसल्याने काही काळ मशिन तशीच पडून राहिली.
 
कोल्हापूर : जिल्ह्यात अद्यापही ई-पॉस मशिनची उपलब्धता न झाल्याने ज्या विक्रेत्यांना हे मशिन मिळाले नाहीत; त्यांना खताची विक्री करणे अडचणीचे झाले आहे. या मशिनशिवाय खतविक्री करू नये, असा अादेश शासनाने काढल्याने विक्री कशी करायची, या चिंतेत खत उत्पादक आहेत. 
 
पहिल्या टप्प्यात म्हणजे चार महिन्यांपूर्वी एकूण विक्रेत्यांच्या फक्त पन्नास टक्के पॉस मशिनची उपलब्धता विक्रेत्यांना झाली. सुरवातीच्या टप्प्यात ही यंत्रणा कशी हाताळायची, याची माहिती नसल्याने काही काळ मशिन तशीच पडून राहिली.
 
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दोन महिन्यांपूर्वी हे मशिन कसे वापरायचे याबाबत प्रशिक्षण दिले खरे़, पण केवळ प्रशिक्षणच झाले. ज्यांच्याकडे मशिन आहे ते विक्रेत्यांनी थोड्या प्रमाणात खताची विक्री सुरू केली, पण ज्याच्याकडे मशिन नाही अशांनी काय करायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
 
अनेक खत उत्पादक कंपन्यांनी मशिन नसल्याने उत्पादकांना खताचा पुरवठा केला नाही. यामुळे या विक्रेत्यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे. शासनाकडे या मशिनच्या उपलब्धतेबाबत विचारताच कधी येइल; त्या वेळी देतो अशी माहिती कृषी विभागाकडून दिली जाते. ती नेमकी कधी मिळतील याचीही शाश्‍वती नाही.
 
ऐन रब्बी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवरच तांत्रिक अडचणींमुळे अनेक दुकानदारांनी खतविक्री थांबविली आहे. यामुळे ज्या विक्रेत्यांकडे हे मशिन आहे त्याच्याकडे जाऊन अतिरिक्त वाहतूक खर्च करीत शेतकरी खते आणत आहेत. रब्बी हंगामासाठी १ लाख ८० हजार मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. पहिल्या टप्प्यात ७४७ मशिन देण्यात आली. ८९० विक्रेते मशिनविना खोळंबले आहेत. खत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल, तर मशिन नसल्याने विक्रेते त्रस्त अशी परिस्थिती आहे.

इतर ताज्या घडामोडी
गैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर...मुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात...
उस पीक सल्ला उसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी...
वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना...पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या...
परभणीतील एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांना... परभणी  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
सातारा जिल्ह्यात ७५ लाख टन उसाचे गाळप सातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप...
कोल्हापुरातील ऊस गाळप हंगाम अंतिम... कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...