agriculture news in Marathi, poisoning responsibility on companies, Maharashtra | Agrowon

विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता निविष्ठा उत्पादक कंपन्यांकडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

फवारणीदरम्यान विषबाधा होऊ नये याकरिता व्यापक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. निविष्ठा उत्पादकांवर जिल्हयाचे पालकत्व देण्यात आले आहे. कृषी, आरोग्य आणि निविष्ठा कंपन्या तिघांचे प्रयत्न याकामी राहतील. या वर्षीच्या हंगामात महत्त्वाकांक्षी असलेल्या शेतीशाळांमधून देखील याच विषयावर जागृती आणि प्राथमिक उपचार पद्धती सांगितली जाणार आहे. मी स्वतः या विषयावर दोन बैठका घेतल्या आहेत.
- सुहास दिवसे, कृषी आयुक्‍त

यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा नियंत्रणासाठी यंदाच्या खरिपात व्यापक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. त्याकरिता खास आराखडा तयार करण्यात आला असून, निविष्ठा उत्पादक कंपन्यांवर जिल्ह्याची जबाबदारी निश्‍चित केली गेली आहे. 

जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून शिफारशीत नसतानाही अनेक कीटकनाशके एकत्रित करीत त्याची फवारणी करण्यात आली. काही ठिकाणी कापसावर शिफारशीत नसलेल्या अतिजहाल कीटकनाशकांचा देखील वापर झाला. याचे दुष्परिणाम फवारणीदरम्यान विषबाधेतून दिसून आले. 

एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ७०० ते ७५० जण फवारणीमुळे बाधित झाले. यातील १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्याच्या विविध भागांत देखील फवारणीदरम्यान विषबाधा व मृत्यूच्या घटना घडल्या. यामुळे राज्य सरकारची यंत्रणा हादरली होती. घटनेच्या चौकशीसाठी समितीचे गठण करण्यासोबतच 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळला भेट दिली.

कृषिमंत्री व कृषिराज्यमंत्री यांचेही दौरे झाले. येत्या हंगामात फवारणीदरम्यान विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी कृषी विभागाने हंगामापूर्वीच कंबर कसली आहे.

कंपन्यांना निर्देश
फवारणीदरम्यान विषबाधा नियंत्रणासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासोबतच बियाणे, खत आणि कीटकनाशक कंपन्यांवर जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले आहे. सुरक्षित फवारणीविषयक जागृतीकरिता प्रशिक्षण, आरोग्यविषयक उपाय व इतर बाबींवर भर देण्याचे निर्देश कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावती आणि यवतमाळची जबाबदारी नुजीविडू कंपनीकडे आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...