agriculture news in marathi, poisoning risk increased by china pump, Nagpur | Agrowon

चायना पंपाने वाढली जिवाची जोखीम
विनोद इंगोले
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पंपाचा दर्जा, त्यातून मिळणारे प्रेशर, या बाबी तपासल्या जातात. पंपासोबत सुरक्षा किट पुरविण्याचे अहवालात नमूद केले जाते. परंतु याचे पालन संबंधित उत्पादक किंवा पुरवठादार करतो किंवा नाही हे सांगणे कठीण आहे.
- धीरज कराळे, समन्वयक, कृषी औजारे व प्रशिक्षण केंद्र, अकोला.
 

यवतमाळ ः बीटीच्या पाकिटात रिफ्युजी बियाण्यांऐवजी बिटी बियाणे; त्यामुळे कीडरोगांचा वाढता प्रादुर्भाव, त्याच्या नियंत्रणासाठी बनावट किटकनाशकांचा वापर, त्यासोबतच आता फवारणीकामी वापरल्या जाणाऱ्या तैवान (चिनी बनावट) पंपाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. कृषी औजारे परीक्षण व प्रशिक्षण केंद्रातून अनुदानापुरत्याच चाचण्या घेऊन, नंतर त्या उत्पादनांचा दर्जा राखला जात नसल्याची चर्चा आहे.

 चीनमधून पॉवर स्प्रेची आयात होते. त्यानंतर अनुदानावर या पंपाचे वितरण सरकारी योजनांतून होते. त्याकरिता कृषी औजारे व प्रशिक्षण केंद्रातून या पंपाच्या दर्जाची पडताळणी करणे सक्‍तीचे आहे. अकोला कृषी विद्यापीठांतर्गत असे केंद्र आहे. या ठिकाणी दरवर्षी सुमारे २७ औजारे तपासली जातात. त्यामध्ये अवघ्या सात ते आठ कंपन्यांचे फवारणी पंप राहतात. फवारणी पंपाच्या तपासणीकरिता २७ हजार रुपयांचे शुल्क विद्यापीठ आकारते.

५० तास हे पंप चालविले जातात. हाताने चालविण्यात येणाऱ्या पंपातून मिनिटाला एक लिटर पाणी फेकले जाते. त्याकरिता १६ वेळा पंप मारावा लागतो. याउलट तायवान पंपाची पाणी फेकण्याची क्षमता एका मिनिटात ३ ते ८ लिटर अशी आहे. त्यासोबतच पाण्याचा दाबदेखील अधिक राहतो. त्यामुळे  किटकनाशके, पाणी जास्त दाबाने फेकली जातात. शेतकरी सुरक्षासाधने वापरत नसल्याने प्रादुर्भावाची शक्‍यता अधिक राहते, असे तज्ज्ञ सांगतात. 

सुरक्षासाधनांचा मुद्दा दुर्लक्षित
फवारणी पंपाचा चाचणी अहवाल देताना त्यात संबंधित कंपनीने फवारणी करताना वापरायची सुरक्षा किट, तसेच फवारणीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांची पुस्तिका पुरवावी, अशी सूचना केलेली असते. परंतु कंपन्या याकडे दुर्लक्ष करतात, अशी माहिती परीक्षण केंद्रातील तज्ज्ञांनी सांगितली. 

रॅन्डमली तपासणी गरजेची
कृषी औजारे व प्रशिक्षण केंद्रातून पडताळणी    केल्यानंतर संबंधित पुरवठादार कृषी आयुक्‍तालयाकडे पंपाचा अनुदान यादीत समावेश व्हावा, याकरिता अर्ज करतो. अनुदान यादीत आलेल्या या उत्पादनांच्या विक्रीकाळात रॅन्डमली तपासणीचे आदेश आहेत. कृषी विभागावर ही जबाबदारी असली तरी हे काम प्रामाणिकपणे होत नाही, परिणामी कमी दर्जाच्या पंपाचा पुरवठा होतो, असे सूत्रांनी सांगितले. 

डीबीटीमुळे वाढले धोके
पंप पुरवठादाराने दिलेल्या माहितीनुसार, आता शासनाने डीबीटी केले आहे. त्यामुळे शेतकरी कोणताही पंप खरेदी करतो. त्यासोबत सुरक्षा किट देण्यातच येत नाही. कृषी विभागाने या पार्श्‍वभूमीवर प्रमाणित पंप आणि विनाप्रमाणित पंपाची यादी विक्री केंद्राच्या दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...