पोखरापूर तलाव प्रकल्प मार्गी लागणार

पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची स्थिती बिकट आहे. पोखरापूरचा प्रकल्प होईल, अशी आशा आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या प्रकल्पाचा मोठा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल. - अण्णा शिंदे, शेतकरी, सारोळे, ता. मोहोळ
पोखरापूर तलाव प्रकल्प मार्गी लागणार
पोखरापूर तलाव प्रकल्प मार्गी लागणार

सोलापूर  : जिल्ह्यातील पोखरापूर तलाव आणि आष्टी उपसा सिंचन योजनेबाबत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी तालुक्‍यातील शिवसेनेच्या नेत्यांची मुंबईत नुकतीच एक बैठक झाली. मार्चपर्यंत या योजनेच्या निविदेबाबतही यावेळी निर्णय झाला.

शिवतारे म्हणाले, पोखरापूर (ता.मोहोळ) तलावाची माहिती घेवून ठाकरे यांनी दुष्काळी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पोखरापूर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मंत्रालयात घेण्याबाबत सूचित केले. त्यानुसार नुकतीच मुंबईत ही बैठक झाली. या योजनेबाबतचे संकल्पचित्र तयार झाले आहे. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करुन पाच मार्चपूर्वी निविदा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले.

या प्रकल्पाबाबत शिवतारे म्हणाले, पोखरापूर तलावातून मोहोळ तालुक्‍यातील पोखरापूर, खवणी व सारोळे या गावांना सिंचनाचा लाभ मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. हा प्रकल्प २००१ पासून रखडला आहे. या प्रकल्पातून तीन गावातील ५८५ हेक्‍टर क्षेत्रासाठी आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा २ मधून पाणी देण्यास पोखरापूर उपसा सिंचना योजनेस शासनाने मान्यता दिली आहे.‘‘ या योजनेंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजेनेच्या उजव्या कालव्यावरील १३ कि.मी. अंतरावरुन पाणी उचलण्याचे, पोखरापूर वितरण कुंडात पाणी टाकल्यानंतर ६ कि.मी. उजवा व ६ कि.मी. डावा प्रवाही कालवा मुळ नियोजनात होता. तो रद्द करुन वितरण कुडांपासून दोन्ही कालवे बंद पाईप लाईनमध्ये परावर्तीत करुन ३० टक्के अधिकचे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे आदेश शिवतारे यांनी दिले.

ठाकरे म्हणाले, की दुष्काळी भागात तीव्र पाणीटंचाई आहे. यावर उपाय म्हणून छोटे प्रकल्प सुरू झाल्यास पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळेल. विकासकामे करताना आणि पाणी वाटप करताना राजकारण बाजूला ठेवून गरजूंना मदत करण्याचे धोरण स्विकारले पाहिजे.‘‘

बैठकीत पोखरापूर योजनेच्या संघर्ष समितीने बैठक आयोजित केल्याबद्दल ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव आर. व्ही. पानसे, संकल्पचित्र कार्यालयाचे प्रमुख रवींद्र उपासने, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अंसारी, मुख्य अभियंता विलास रजपूत, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पोखरापूर उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com