agriculture news in marathi, police airfiring on Sugarcane farmers agitation at khanapur | Agrowon

खानापूर येथे ऊस आंदोलन चिघळले; पोलिसांचा हवेत गोळीबार
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

शेवगाव, जि. नगर : ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसापासून सुरु केलेल्या आंदोलनाला खानापूर येथे बुधवारी (ता. १५) पोलीसांनी केलेल्या लाठीमार व गोळीबारामुळे हिंसक वळण लागले.

पोलीसांनी केलेल्या गोळीबारात उध्दव विक्रम मापारी (वय ३६) बाबुराव भानुदास दुकळे (वय ४३) राहणार तेलवाडी (ता. पैठण) हे शेतकरी जबर जखमी झाले आहेत. संतप्त झालेल्या शेतक-यांनी जागोजागी शेवगाव-पैठण राज्यमार्ग टायर व लाकडी ओंडके जाळत बंद पाडला. 

शेवगाव, जि. नगर : ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसापासून सुरु केलेल्या आंदोलनाला खानापूर येथे बुधवारी (ता. १५) पोलीसांनी केलेल्या लाठीमार व गोळीबारामुळे हिंसक वळण लागले.

पोलीसांनी केलेल्या गोळीबारात उध्दव विक्रम मापारी (वय ३६) बाबुराव भानुदास दुकळे (वय ४३) राहणार तेलवाडी (ता. पैठण) हे शेतकरी जबर जखमी झाले आहेत. संतप्त झालेल्या शेतक-यांनी जागोजागी शेवगाव-पैठण राज्यमार्ग टायर व लाकडी ओंडके जाळत बंद पाडला. 

परिस्थितीचे तणाव पुर्ण होत असल्याचे पाहून पोलीसांनी शीघ्र कृती दलास पाचारण केले. आंदोलकांनी पोलीसांवर व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केल्याने वातावरण चिघळले. बसस्थानकाजवळ आंदोलकांनी रस्ता बंद करुन दोन्ही बाजूने पोलीसांना घेरले. यावेळी पोलीसांनी आश्रुधुराचे नळकांडे फोडत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीसांनी हवेत गोळीबार करत आंदोलकांवर लाठीमार करुन ११ जणांना ताब्यात घेतले.

या झटापटीत २५ ते ३० शेतकरी, पोलीस उपाधिक्षक सुदर्शन मुंढे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. गोळीबारातील जखमींना शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात आणले. मात्र यातील मापारी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

आंदोलन सुरु असले तरी त्यात प्रवाशांना वेठीस धरल्याने आम्हाला बळाचा वापर करावा लागाला. आंदोलकांना पांगविण्यासाठी त्यांच्यावर प्लास्टीकच्या छर्रयांनी गोळीबार केला असल्याचे पोलीस अधिका-यांचे म्हणणे आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
गोंधळलेला शेतकरी अन् विस्कळित नियोजनशेती क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व हे नियोजनाला आहे...
निराशेचे ढग होताहेत अधिक गडद७  ते १० जूनपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस   ...
राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागूमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
‘एसएमएस’ अटीमुळे हजारो शेतकरी...लातूर : शासनाने राज्यातील चार लाखापेक्षा जास्त...
शेतातील जीवसृष्टी सांभाळल्यास मातीतून...नाशिक : शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री...नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२...
कांदाप्रश्‍नी ‘करेक्शन’ करण्याच्या...नाशिक : लोकसभेच्या आगामी निवडणुकांकडे लक्ष...
राज्यातील १४५ बाजार ‘ई-नाम’शी जोडणारमुंबई (प्रतिनिधी) : शेतमालाला रास्त भाव मिळवून...
काय आणि कसं पेरावं ?लाखनवाडा, जि. बुलडाणा ः लाखनवाडा येथे एेन खरीप...
जलसंधारण, बहुवीध पीक पद्धतीतून धामणी...अनेक वर्षांपासून दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या...
भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप...भारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान...
का झाले बीटीचे वाटोळे?राज्यात सुमारे १५० लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो...
अनधिकृत कापूस बियाणे आणि हतबल सरकारमहाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने ...
नवे संशोधन, नवे वाण ही काळाची गरज...आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारास झालेला विलंब...
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेरजळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव...
एच. टी. तंत्रज्ञानाला मान्यता देऊन...पुणे ः राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या कापूस...
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज...
नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध... नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक...