खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक व सुटका

खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक व सुटका
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक व सुटका

नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी निघालेल्या जनआक्रोश हल्लाबोल पदयात्रेद्वारे नागपूरच्या हद्दीत प्रवेश करीत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात मंगळवारला हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या 1 डिसेंबरपासून यवतमाळपासून हल्लाबोल पदयात्रा सुरू केली. आज पदयात्रेच्या 11 व्या दिवशी ही पदयात्रा नागपूर शहरात पोहोचली. या पदयात्रेचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख करीत होते. 

या पदयात्रेत जवळपास दीड हजारावर कार्यकर्ते होते व शांततेत ते नागपुरात येत होते. या पदयात्रेला नागपूर पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ अडविले. दिंडीला अडविल्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसले. सुप्रिया सुळे व अनिल देशमुख पोलिसांशी चर्चा करीत होते. दिंडी शांततेने येत आहे. वाहतुकीला कोणताही त्रास होत नाही, हे सांगत असताना पोलिसांनी अडेलतट्टू भूमिका घेऊन सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. हल्लाबोल हल्लाबोल अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला. 

सुळे यांना अटक केल्यामुळे आतापर्यंत शांत राहिलेले कार्यकर्ते संतप्त झाले. या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्यांची हवा सोडली तसेच पोलिस व्हॅनच्या टपावर चढले. कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी खासदार सुळे व अनिल देशमुख यांची सुटका केली. 

सरकारच्या दबावाखाली अटक -भास्कर जाधव  कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता पदयात्रा काढणाऱ्या हल्लाबोल मोर्चातील कार्यकर्त्यांना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्याचा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्या, यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असताना कोणतेही कारण न देता राज्य सरकारच्या दबावाखाली नागपूर पोलिसांनी अटक केली. हे कृत्य निषेधार्ह आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com