agriculture news in marathi, Police arrests supriya sule in nagpur | Agrowon

खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक व सुटका
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी निघालेल्या जनआक्रोश हल्लाबोल पदयात्रेद्वारे नागपूरच्या हद्दीत प्रवेश करीत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली. 

नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी निघालेल्या जनआक्रोश हल्लाबोल पदयात्रेद्वारे नागपूरच्या हद्दीत प्रवेश करीत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात मंगळवारला हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या 1 डिसेंबरपासून यवतमाळपासून हल्लाबोल पदयात्रा सुरू केली. आज पदयात्रेच्या 11 व्या दिवशी ही पदयात्रा नागपूर शहरात पोहोचली. या पदयात्रेचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख करीत होते. 

या पदयात्रेत जवळपास दीड हजारावर कार्यकर्ते होते व शांततेत ते नागपुरात येत होते. या पदयात्रेला नागपूर पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ अडविले. दिंडीला अडविल्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसले. सुप्रिया सुळे व अनिल देशमुख पोलिसांशी चर्चा करीत होते. दिंडी शांततेने येत आहे. वाहतुकीला कोणताही त्रास होत नाही, हे सांगत असताना पोलिसांनी अडेलतट्टू भूमिका घेऊन सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. हल्लाबोल हल्लाबोल अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला. 

सुळे यांना अटक केल्यामुळे आतापर्यंत शांत राहिलेले कार्यकर्ते संतप्त झाले. या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्यांची हवा सोडली तसेच पोलिस व्हॅनच्या टपावर चढले. कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी खासदार सुळे व अनिल देशमुख यांची सुटका केली. 

सरकारच्या दबावाखाली अटक -भास्कर जाधव 
कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता पदयात्रा काढणाऱ्या हल्लाबोल मोर्चातील कार्यकर्त्यांना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्याचा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्या, यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असताना कोणतेही कारण न देता राज्य सरकारच्या दबावाखाली नागपूर पोलिसांनी अटक केली. हे कृत्य निषेधार्ह आहे. 

इतर बातम्या
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...