agriculture news in Marathi, police custody for walmi director general and associate director in corruption case, Maharashtra | Agrowon

लाचप्रकरणी वाल्मीच्या महासंचालकासह सहसंचालकास पोलिस कोठडी
टीम अॅग्रोवन
रविवार, 31 डिसेंबर 2017

औरंगाबाद : लाच प्रकरणात अटक करण्यात आलेले वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी व अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी शनिवारी (ता. ३०) दिले. 

औरंगाबाद : लाच प्रकरणात अटक करण्यात आलेले वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी व अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी शनिवारी (ता. ३०) दिले. 

औरंगाबादच्या वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी (रा. मूळ नाशिक, सध्या रा. वाल्मी), आणि अधीक्षक अभियंता व सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर (मूळ रा. पुणे, सध्या. रा. वाल्मी वसाहत) यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने दहा लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शुक्रवारी (ता. २९) रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर अटकेतील दोघांनाही शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी जिल्हा मुख्य सरकारी वकील ॲड. अविनाश देशपांडे यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दोघांनाही ४  जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

वाल्मीच्या विज्ञान शाखेचे तक्रारदार प्राध्यापक यांना वाल्मीचे महासंचालक गोसावी आणि अभियंता क्षीरसागर हे त्यांचे कायमस्वरूपी निलंबन व्हावे या हेतूने त्रास देऊन दोन ते तीन महिन्यांपासून प्राध्यापकांना सतत मेमो दिले जात होते. ‘तुमची नेमणूक चुकीच्या पद्धतीने झाली आहे, तुम्ही दिलेली शैक्षणिक कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे बोगस आहेत,’ असा आरोप केला होता.

तसेच कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत होते. याशिवाय ज्या संस्थेने कायम केले आहे, ते रद्द करू व निलंबित करू, असे सांगितले होते. निलंबन रोखणे आणि कागदपत्रे परत मिळविण्यासाठी गोसावी आणि क्षीरसागर यांनी दहा लाखांची मागणी प्राध्यापकांकडे केली होती. 

या त्रासाला कंटाळलेल्या प्राध्यापकांनी एवढे पैसे देणे जमणार नाही. पाच ते सहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, गोसावी आणि क्षीरसागर यांनी दहा लाख रुपये द्यावेच लागतील, असा पावित्रा घेतला. त्यामुळे शेवटी प्राध्यापकांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी हरिभाऊ गोसावी यांनी राजेंद्र क्षीरसागर यांच्यामार्फत दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. 

कारवाईनंतर लाचलुचपत विभागाने दोघांच्याही पुणे, नाशिक, सोलापूर येथील घरीही झाडाझडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.   लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक श्री. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, बाळा कुंभार, निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस नाईक हरिभाऊ कुजहे, गोपाळ बरंडवाल, संदीप आव्हाळे, शिपाई होनराव, अरुण उगले आणि बाळासाहेब राठोड यांनी ही कारवाई केली होती.

इतर अॅग्रो विशेष
‘कर्जनिधी’चा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार...केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्ज म्हणून ११ लाख...
अधिक नुकसान, कमी भरपाईराज्यभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही...
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
तेहेतीस वर्षांपासून ‘बोन्साय’ कलेचा...पुणे येथील प्राजक्ता काळे यांनी ३३ वर्षांपासून...
उसापेक्षा किफातशीर ठरले रताळेसोलापूर जिल्ह्यातील बाभूळगावाने रताळे पिकात आपली...
हमी नको, हवा रास्त भाव केंद्र सरकारने २०१८ चा अर्थसंकल्प सादर करताना...
राज्यात अधिकाधिक ‘सीड पार्क’...दर्जेदार बियाण्यांच्या संशोधनासाठी खासगी...
दीडपट हमीभाव : केंद्र सरकारचं लबाडाघरचं...केंद्र सरकार आकड्यांचा खेळ करून स्वतःच्या सोयीचा...
उत्पादन खर्च काढण्यात सरकारची चलाखीपुणे : केंद्र सरकार आपल्या सोयीचा उत्पादन...