agriculture news in marathi, Police guard in dam area along with Gangapur | Agrowon

गंगापूरसह धरण परिसरात पोलिसांकडून खडा पहारा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

नाशिक : गंगापूरसह अन्य धरणांमधून सोमवार (ता. २९) पासून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग गंगापूर धरण परिसराची पाहणी करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथे काही कर्मचारी तैनात केले असून, रविवार (ता. २८) सायंकाळपासून येथे खडा पहारा ठेवण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

नाशिक : गंगापूरसह अन्य धरणांमधून सोमवार (ता. २९) पासून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग गंगापूर धरण परिसराची पाहणी करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथे काही कर्मचारी तैनात केले असून, रविवार (ता. २८) सायंकाळपासून येथे खडा पहारा ठेवण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध यंत्रणांच्या समन्वयाची बैठक घेतली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठा विकास महामंडळाने दिले आहेत.

या दोन्ही जिल्ह्यांमधून तब्बल ८.९९ टीएमसी पाणी सोडावे लागणार असून, ते सोडण्यास दोन्ही जिल्ह्यांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीनही धरण समूहांमधून ३.२४ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले असताना आणि अन्य तालुक्यांमध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसताना पाणी सोडण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांसह शेतकरी, तसेच अन्य सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरवात केली आहे.

पाणी सोडल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी राज्य सरकार आणि प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारपासून धरणांमधून पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केल्याने या विरोधाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

वहन मार्गावरही बंदोबस्त
पाणी सोडण्याचा मुद्दा सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पाणी सोडण्याबाबतचे लेखी आदेश अद्याप दिलेले नाहीत. परंतु, रविवारनंतर कधीही जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता असून, पोलिसांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. वहन मार्गासह धरण परिसरातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरणाचा परिसर अधिक संवेदनशील असल्याने पोलिस उपअधीक्षक सचिन गोरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गंगापूर धरण परिसराला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी दुपारी पुन्हा ग्रामीण पोलिसांचे पथक गंगापूर धरण परिसरात दाखल झाले. धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असून, बॅरिकेडिंगचेही नियोजन केले जात आहे. गरज भासल्यास रविवारी सायंकाळपासून बंदोबस्त वाढविण्याचे संकेत पोलिसांकडून दिले जात आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...