agriculture news in marathi, Police will be involved in agri input saleing projects | Agrowon

कृषी निविष्ठा विक्री मोहिमेत पोलिसांना सहभागी करणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

यवतमाळ : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता सावधगिरीच्या पावित्र्यात असलेल्या कृषी विभागाने यावर्षीच्या निविष्ठा विक्री मोहिमेत पोलिसांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता लवकरच यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांकरीता कार्यशाळा होणार आहे. 

यवतमाळ : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता सावधगिरीच्या पावित्र्यात असलेल्या कृषी विभागाने यावर्षीच्या निविष्ठा विक्री मोहिमेत पोलिसांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता लवकरच यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांकरीता कार्यशाळा होणार आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरिपात एचटी सीड मोठ्या प्रमाणावर विकल्या गेले. त्यानंतर कीडनाशकांचा बेसुमार वापर झाल्याने त्यातही अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावे लागला. 
यवतमाळ जिल्ह्यात एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे राज्यात सर्वदूर खळबळ उडाली. यावर्षीच्या खरिपात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता आतापासूनच कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात पोलिसांकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. 

विभागीय आयुक्‍त पीयूष सिंग यांनी या संदर्भाने यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले आहे. पत्रानुसार, पोलिस अधिकाऱ्यांना बियाणे, खत तसेच कीडनाशक कायद्याची माहिती कार्यशाळेतून देण्याचे अभिप्रेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत पोलिसांना संबंधीत कायद्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. 

लवकरच कार्यशाळेची तारीख निश्‍चित होणार असून, या संदर्भाने विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

पोलिसांना बियाणे, खत आणि कीडनाशक विषयक असलेल्या कायद्यांची माहिती कार्यशाळेतून दिली जाणार आहे. विभागीय आयुक्‍त पीयूष सिंग यांनी या कार्यशाळेसाठी पुढाकार घेतला असून लवकरच तारीख निश्‍चित करून ही कार्यशाळा घेतली जाईल.
- सुभाष नागरे, 
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...