agriculture news in marathi, political news, Devendra Fadanvis | Agrowon

मुख्यमंत्रीपदासाठी शनिमांडळला एकटाच जाईन : फडणवीस
सरकानामा ब्युरो
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

जळगाव  : ''नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ देवस्थान जागृत आहे. त्या ठिकाणी जो नेता जातो तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, असे सांगितले जाते. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्या ठिकाणी जाईन पण एकटाच. विरोधक सोबत असणार नाही याची काळजी घेईन,'' असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सारंगखेडा(जि.नंदुरबार) येथे आयोजित चेतक महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. राज्यात रोजगारासाठी पर्यटनाला वाव देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

जळगाव  : ''नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ देवस्थान जागृत आहे. त्या ठिकाणी जो नेता जातो तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, असे सांगितले जाते. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्या ठिकाणी जाईन पण एकटाच. विरोधक सोबत असणार नाही याची काळजी घेईन,'' असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सारंगखेडा(जि.नंदुरबार) येथे आयोजित चेतक महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. राज्यात रोजगारासाठी पर्यटनाला वाव देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

एकमुखी दत्ताच देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या सारंगखेडा (जि.नंदुरबार) येथे दत्तजयंतीनिमित्ताने दरवर्षी यात्रा भरते. त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घोड्यांची खरेदी विक्रीही होते. त्याचे औचित्त साधून पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणी 'चेतक महोत्सव' आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावीत, खासदार हिना गावित, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार विजय गावित यांनी नंदुरबार जिल्हयाच्या शनिमांडळ जागृत देवस्थानचा उल्लेख केला. ते म्हणाले, ''या देवस्थानला जो कोणी नेता जातो तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो." हाच धागा पकडून आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, "शनिमांडळ देवस्थानला मीसुध्दा आता जाईन. परंतु, एकटाच जाईन. विरोधक सोबत असणार नाही. अर्थात जयकुमार रावल, विजयकुमार गावित सोबत असतील तर काही हरकत नाही. पण विरोधक नको,"

उद्योगातून नव्हे पर्यटनातून रोजगार
आजच्या काळात पर्यटनाला अधिक महत्व असल्याचे सांगून ते म्हणाले, ''उद्योगातून जास्त रोजगार निर्मिती होत असेल असे म्हणजे योग्य नाही. सद्य स्थितीत पर्यटनातून सर्वात अधिक रोजगार मिळत आहे. त्या माध्यमातून अगदी लहानात लहान व्यवसायिकालाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे राज्यात पर्यटनाला चालना देण्यात येईल.''

फडणवीसच ब्रॅंड अम्बॅसिडर :रावल
राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी बोलतांना म्हणाले, ''शेजारच्या राज्यात पर्यटनाचे ब्रॅंड अम्बॅसिडर अभिनेता आहेत. महाराष्ट्रात कोण आहे? असे विचारले जाते. परंतु, सर्वच बॉलीवूड आमचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यटनाला चालना देत आहेत. त्यामुळे तेच आमच्या पर्यटनाचे ब्रॅंड अॅम्बेसिडर आहेत.''

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...