agriculture news in marathi, political parties demand to declar drought in parbhani, maharashtra | Agrowon

परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

परभणी  : संपूर्ण परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जायकवाडी प्रकल्पातून सिंचनासाठीचा पाणीवापर कमी करणारे फेरनियोजन रद्द करण्यात यावे, २०१७ मधील खरीप हंगामातील सोयाबीन; तसेच अन्य पिकांचा विमा परतावा मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तत्काळ अदा करावा, २०१८ मधील खरीप हंगामातील पीक विमा नुकसानभरपाई ॲडव्हान्स अदा करावी.

परभणी  : संपूर्ण परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जायकवाडी प्रकल्पातून सिंचनासाठीचा पाणीवापर कमी करणारे फेरनियोजन रद्द करण्यात यावे, २०१७ मधील खरीप हंगामातील सोयाबीन; तसेच अन्य पिकांचा विमा परतावा मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तत्काळ अदा करावा, २०१८ मधील खरीप हंगामातील पीक विमा नुकसानभरपाई ॲडव्हान्स अदा करावी. आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी प्रत्येक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासकीय खरेदी केंद्र सुरू करावीत आदी मागण्यांसह महागाई, इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बुधवारी (ता.२६) विविध पक्ष, संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींसह पुरोगामी विचारांच्या पक्ष संघटनांतर्फे भाजप सरकार विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी विविध मागण्या करण्यात आल्या.या मोर्चामध्ये माजी कृषी राज्यमंत्री तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, रविराज देशमुख, बाळासाहेब देशमुख, हरिभाऊ शेळके, रामभाऊ घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराजसिंह परिहार, बाळासाहेब जामकर, तहसीन अहमदखान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजन क्षीरसागर, शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मणराव गोळेगावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माणिक कदम आदींसह विविध पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
या आहेत प्रमुख मागण्या

 • अपुऱ्या पावसामुळे परभणी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे संपूर्ण परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.  
 • पेट्रोल, डिझेल तसेच गॅस दरवाढ रद्द करावी.  
 • राफेल घोटाळा प्रकरणाची संयुक्त संसदीय चौकशी करावी. 
 • प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करावी. 
 • जायकवाडी प्रकल्पातून शेतीसाठीचा पाणीवापर कमी करणारे फेरनियोजन रद्द करावे. 
 • गतवर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य पिकांचा विमा परतावा मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तत्काळ अदा करावा.
 •  जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक नियोजन जाहीर करावे. 
 • साखर, तूर, सोयाबीन तसेच अन्य शेतीमालाची आयात बंद करावी.   
 • संपूर्ण कर्जमाफी बिनशर्त लागू करावी. 
 • डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. 
 • ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना कराव्यात.

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...