agriculture news in Marathi, politics behind sugarcane rate issue, Maharashtra | Agrowon

निमित्त ऊस दराचे, पडघम निवडणुकांचे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे यंदाचाही ऊस हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही आता ऊस परिषदांची घोषणा विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. उसाला पहिला हप्ता किती मिळणार, याचबरोबर आता या परिषदांमधून आता संभाव्य निवडणुकीची रणनितीही आखली जाण्याची शक्‍यता आहे. यादृष्टीनेही शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आक्‍टोंबरच्या उत्तरार्धात या परिषदा होणार आहेत.

कोल्हापूर : ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे यंदाचाही ऊस हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही आता ऊस परिषदांची घोषणा विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. उसाला पहिला हप्ता किती मिळणार, याचबरोबर आता या परिषदांमधून आता संभाव्य निवडणुकीची रणनितीही आखली जाण्याची शक्‍यता आहे. यादृष्टीनेही शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आक्‍टोंबरच्या उत्तरार्धात या परिषदा होणार आहेत.

गेल्या वर्षभरात साखरेच्या दरात जसे चढ उतार झाले तशीच परिस्थिती साखर पट्ट्यातील राजकारणावरही झाली. खासदार राजू शेट्टी यांचा एकछत्री अंमल असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावर संघटनेतून बाहेर काढण्याची कारवाई केली.

यानंतर श्री. शेट्टी व श्री. खोत समर्थकांत सर्वच पातळीवर युद्ध सुरू झाले. श्री. खाेत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना करून स्वाभिमानीला आव्हान दिले. पण सरकारी धोरणाची मिळतीजुळती तत्त्वे असणाऱ्या या संघटनेने फारशी प्रभावी आंदोलने केली नाहीत. श्री. खोत यांच्याकडून सातत्याने सरकारचे गोडवे गाण्याचा प्रयत्न झाल्याने संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व जाणवले नाही.

उस परिषदेचा बिगूल १० ऑक्‍टोबरला कोल्हापुरातून वाजणार आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने ही परिषद होणार आहे. २४ ऑक्‍टोबरला रयत क्रांती संघटनेची ऊस परिषद वारणा कोडोली येथे होणार आहे. २५ आक्‍टोबरला आंदोलन अंकुश या संघटनेची शेतकरी संवाद सभा शिरोळ येथे होणार आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उस परिषद २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूरला होणार आहे. रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेत शेट्टी विरोधकांना मानाचे स्थान असणार हे उघड आहे. श्री. खोत यांनी उसाचा दर भरघोस मिळणार असल्याने आता आंदोलनाची गरज नसल्याचे सांगून स्वाभिमानीच्या लढ्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. रयतच्या परिषदेत याच प्रश्‍नावर चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परिषदेतही सरकारबरोबरच सदाभाऊ खोत यांच्या विरोधातही तोफा धडधडतील अशी शक्‍यता आहे. या दृष्टीने संघटनेच्या वतीने तयारी सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांत येणाऱ्या निवडणुकाच्या दृष्टीने अंदाज घेण्याचा प्रयत्नही बहुतांशी ऊस परिषदांमधून होइल, असे अंदाज व्यक्त होत आहेत. एकमेकांच्या भूमिकेला खिंडीत पकडण्याची व्यूहरचना आता प्रत्येक संघटनेकडून सुरू झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...