agriculture news in marathi, Politics of pressures even when no one can file a crime | Agrowon

गुन्हा दाखल करता येत नसतानाही दबावाचे राजकारण : दिलीप माने
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

सोलापूर  : "बाजार समितीतील गैरव्यवहारासंबंधी सुरेश हसापुरे व राजशेखर शिवदारे यांनी केलेल्या तक्रारीवर चौकशी झाली. प्रभारी विशेष लेखापरीक्षक व्ही. व्ही. डोके यांनी या चौकशीत गुन्हा दाखल करता येत नसल्याचे लेखी लिहून दिले. तरीही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पाच वेळा लेखापरीक्षण करून सहकार व गृह विभागातील अधिकाऱ्यांवर सत्तेचा दबाव आणून आमच्यावर गुन्हा दाखल केला," असा आरोप माजी आमदार दिलीप माने यांनी पत्रकार परिषदेत केला.

सोलापूर  : "बाजार समितीतील गैरव्यवहारासंबंधी सुरेश हसापुरे व राजशेखर शिवदारे यांनी केलेल्या तक्रारीवर चौकशी झाली. प्रभारी विशेष लेखापरीक्षक व्ही. व्ही. डोके यांनी या चौकशीत गुन्हा दाखल करता येत नसल्याचे लेखी लिहून दिले. तरीही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पाच वेळा लेखापरीक्षण करून सहकार व गृह विभागातील अधिकाऱ्यांवर सत्तेचा दबाव आणून आमच्यावर गुन्हा दाखल केला," असा आरोप माजी आमदार दिलीप माने यांनी पत्रकार परिषदेत केला.

सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू आहे. त्यात माने यांच्यासह तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने अटकपूर्व जामिनासाठी ते न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार प्रकाश वानकर, बाळासाहेब शेळके, जितेंद्र साठे, पालकमंत्री देशमुख यांचे चिरंजीव नगरसेवक डॉ. किरण देशमुख, महापालिका सभागृह नेते संजय कोळी आदी उपस्थित होते.

माने म्हणाले,  "देशमुख यांचे पालकमंत्रीपद घालविण्यासाठी व २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ृृृृमाझा राजकीय प्रवास संपविण्यासाठी देशमुख आम्हाला टार्गेट करतात. आपल्यावर केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. ब्रह्मदेवदादा माने सहकारी बॅंकेत असलेल्या समितीच्या ठेवी प्रशासकांनी मुदतपूर्व काढल्या. त्यामुळे समितीचे दोन टक्के व्याजाचे (साधारणतः दीड कोटी रुपये) आणि माने बॅंकेत नऊ टक्के व्याजाने असलेल्या ठेवी कॅनरा बॅंकेत सात टक्‍क्‍यांनी ठेवल्याने एकूण चार टक्‍क्‍यांचे (साधारणतः तीन कोटी) नुकसान झाले आहे. या ठेवी कॅनरा बॅंकेत ठेवून "लोकमंगल''शी संबंधित असलेल्या संस्थांना कॅनरा बॅंकेने कर्जवाटप केले आहे. या सर्व प्रकाराबद्दल प्रशासकाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे."  

मुख्यमंत्र्यांची सहमतीच
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सत्तेचा गैरवापर करून गुन्हे दाखल केलेल्यांपैकी काही लोक पालकमंत्री देशमुखांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही या निवडणुकीत एकत्र आलो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे, असा दावाही माने यांनी केला.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...