agriculture news in Marathi, Polling in Kolhapur, Hatkanangale constituency | Agrowon

कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने मतदान  
बुधवार, 24 एप्रिल 2019

कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. २३) चुरशीने मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित कोल्हापूर 69 टक्के, हातकणंगले 68.50 टक्के दोन्ही मतदारसंघांत मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत कमालीची चुरस पाहण्यास मिळाली. किरकोळ वादावादी वगळता बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. 

कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. २३) चुरशीने मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित कोल्हापूर 69 टक्के, हातकणंगले 68.50 टक्के दोन्ही मतदारसंघांत मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत कमालीची चुरस पाहण्यास मिळाली. किरकोळ वादावादी वगळता बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक व भाजपा शिवसेना महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात सामना होत आहे. तर हातकणंगले मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आव्हान निर्माण केले आहे.  

इर्षेने मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे. कोल्हापूर मतदारसंघात दोन हजार १४८ व हातकणंगलेत एक हजार ८५६ मतदान केंद्रे आहेत. कोल्हापूर २४७ आणि हातकणंगलेत  १६५ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर मतदान झाले.  

या सर्व केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सकाळी आठ पासूनच रांगा लागल्या. शेतकरी, शेतमजूर व नोकरदारांनी कामावर जाण्याअगोदरच मतदान करण्यास प्राधान्य दिल्याने विशेष करुन ग्रामीण सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लागल्या. यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत पंचवीस टक्‍यापर्यंत मतदान झाले होते. अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाकडून मतदान स्लीपचे वाटप न झाल्याने गोंधळाचे वातावरण राहिले. विशेष करुन नवमतदारांना आपले नाव नेमके कुठे आहे हे पहाताना कसरत करावी लागली. अनेकांनी आयोगाच्या लिंकद्वारे नावे शोधण्याचा प्रयत्न केला.  

बारा नंतर काहीसा वेग कमी आला. दुपारी चार वाजेपर्यंत पन्नास टक्‍यापर्यंत मतदान गेले. कोल्हापुरात राज्यात सर्वाधिक मतदान होण्याची परंपरा असल्याने सायंकाळच्या टप्प्यात पुन्हा मतदानाला वेग आला. सायंकाळी मतदान झाल्यानंतर कोल्हापूर मतदारसंघातील मतदान यंत्रे कसबा बावडा येथील रमण मळा येथे आणि हातकणंगलेतील राजाराम तलाव येथील इरिगेशनच्या कार्यालयात ठेवण्यात आली. दोन्ही ठिकाणी सुरक्षा कक्ष (स्ट्रॉंग रूम) तयार केली आहेत. ३२ सीसीटीव्ही सुरू केले आहेत. मतदान यंत्र ठेवल्यानंतर याचा ताबा केंद्रीय पोलिस दलाकडे देण्यात आला.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...