नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज मतदान

नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज मतदान
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज मतदान

नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघात आज (ता. १८) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या तीन मतदारसंघात एकूण ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदासंघातील ६ हजार १९१ मतदान केंद्रांवर एकूण ५४ लाख ३५ हजार ५२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

नांदेड लोकसभा मतदारसंघात कॅांग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस आघाडीचे अशोक चव्हाण, भाजप- शिवसेना महायुतीचे प्रताप पाटील -चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.यशपाल भिंगे यांच्यासह एकूण १४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, देगलूर, मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण २ हजार २८ मतदान केंद्रे आहेत. एकूण १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे संजय (बंडू) जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे राजेश विटेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजन क्षीरसागर, वंचित बहुजन आघाडीचे आरमगीर खान यांच्यासह एकूण १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, परतूर, घनसावंगी या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार १७४ मतदान केंद्रे आहेत. एकूण १९ लाख ८५ हजार २२७ मतदार मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावतील.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे सुभाष वानखेडे, शिवसेना भाजप महायुतीचे हेमंत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यासह एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हिंगोली, वसमत, कळमनुरी, हदगाव, किनवट, उमरखेड या सहा विधानसभा मतदारसंघातील १ हजार ९८९ मतदान केंद्रांवर १७ लाख ३२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 लातूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांच्या लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर हे किती मते घेणार हेही महत्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघात लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा व  लोहा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदारांची संख्या १८ लाख ८३ हजार ५३४ आहे. तर मतदान केंद्रांची संख्या दोन हजार ७५ आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com