नगर जिल्ह्यातील ९० गावांना दूषित पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करावा असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात सध्या सुमारे ९० गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पारनेर तालुक्‍यातील सर्वाधिक गावे असल्याची बाब आरोग्य विभागाच्या मासिक तपासणीत स्पष्ट झाली आहे.

ग्रामीण भागातील गावखेड्यात शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभागामार्फत उपाययोजना राबवल्या जातात. गावांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रत्येक गावांत एक जलसुरक्षक नियुक्तकेला आहे. याशिवाय पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडरही दिली जाते. मात्र या साऱ्या उपाययोजनांकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आली आहे.

पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यामधील सुमारे ९० गावे दूषित पाणी पीत असल्याचे आरोग्य विभागाच्या मासिक अहवालात स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्याच्या अहवालानुसार १८३४ पाणी नमुने तपासले. त्यातील ९० गावांमधील १३८ स्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. एप्रिलपासून जुलैपर्यत म्हणजे चार महिन्यांत ६७५९ स्रोत तपासले त्यातील ४९७ स्रोताचे पाणी दूषित आढळले आहे. याशिवाय पाच गावांत पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी टीसीएल पावडरही खराब आहे.

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे पारनेर ः गारगुंडी, पिपळगाव रोठा, म्हस्केवाडी, चोंभुत, शिरापूर, रांधे, पिंपळनेर, पळवे बु. बाभुळवाडे, पाडळी दर्या, लोणी हवेली, सुपा, हंगा, मावळेवाडी, नारायणगव्हाण, यादववाडी, गटेवाडी, वांघुंडे खु., कडूस, पाडळी, वाडेगव्हाण, वाघुंडे, बु. अकोले ः मोग्रस, पांजरे, शेरणखेल, कळंब, बेलापूर, कोलठेंभे, शिरपुंजे, साकीरवाडी, कौठेवाडी, गर्दनी, नागवाडी, देवठाण, घोडसरवाडी. नगर ः देवगाव, सारोळा, घोसपुरी, पारगाव, खांडके, बारदरी, केकती, नवनागापूर, वडगाव गुप्ता, दशमीगव्हाण. संगमनेर ः रणखांब, पेमगिरी, संगमनेर खु,. पिंपळगाव कोंजिरा, चिकणी, डोळासणे, जोर्वे, मनोली, प्रतापपूर, भोजदरी. शेवगाव ः आव्हाणे, नांदूर, जोहरापूर, मजले शहर, बोधेगाव, मळेगाव, भातकुडगाव, आंतरवाली, खामपिंप्री. पाथर्डी ः जिरेवाडी, केळवंडी, आल्हाणवाडी, चुंभळी, करडवाडी, मुंगुसवाडे, शिराळ, पाथर्डी शहर. राहुरी ः शेलेगाव, टेकाडवाडी, काद्रड, चेडगाव, गुंजाळे, कोल्हार, बु, केंदळ. जामखेड ः कुसडगाव, सदरवाडी, पाटोदा, खामगाव, भोगलवाडी, दरडवाडी, बाळगव्हाण. श्रीगोंदा ः कोळगाव, मानमोडी, घारगाव, ढोरजा, कोथुळ. कोपरगाव ः जवळके, दहीगाव बोलका, घारी, मढी बु. कर्जत ः वायसेवाडी, करभणवाडी, खेड. नेवासा ः मंगळापूर, गोगलगाव, पिचडगाव. राहाता ः लोणी बु, राजुरी, एकरुखे. श्रीरामपूर ः मालुंजा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com