पडझडीनंतर सुधारणा; वाढत्या प्लेसमेंटचा दसऱ्यानंतर दबाव

दसरा आणि पुढील उत्सवी सणांच्या पार्श्वभूमीवर, इंटिग्रेटर्स आणि ओपन फार्मर्सकडून मोठ्याप्रमाणावर प्लेसमेंट वाढवण्यात आली आहे. यामुळे संबंधित कालावधीत मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडू शकते. - डॉ. अनिल फडके, नाशिक.
पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यात साचलेल्या मालामुळे ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार पडझड झाली. श्रावण संपल्यानंतर खपवृद्धीमुळे बाजार सावरला आहे. दरम्यान, सध्याच्या वाढत्या प्लेसमेंटमुळे दसऱ्यानंतर बाजारात पुरवठावाढीचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

नाशिक विभागात शनिवारी (ता.८) ५४ ते ५५ रुपयांदरम्यान ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव प्रतिकिलोमागे ८ रुपयांनी कमी झाले आहेत. मार्केटच्या सद्यःस्थितीबाबत नाशिकस्थित व्हिनस पोल्ट्रीचे संचालक डॉ. अनिल फडके म्हणाले, की मोठ्या वजनाच्या पक्ष्यांना सध्या चांगली मागणी आहे. श्रावण संपल्यामुळे शहरी भागात चिकनच्या खपात वाढ अपेक्षित आहे. मध्य प्रदेश, गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या पातळीवर समांतर रेट्स आहेत. गणेशोत्सव काळात घटत्या मागणीनुसार संतुलित पुरवठ्याचे नियोजन केले आहे. सध्याची तापमानातील वाढ आणि आर्द्र वातावरणामुळे पक्ष्यांची वजने नियंत्रणात राहतील. सध्याच्या भावपातळीवर बाजारभाव स्थिरावण्याची शक्यता आहे.

दसरा आणि पुढील उत्सवी सणांच्या पार्श्वभूमीवर, इंटिग्रेटर्स आणि ओपन फार्मर्सकडून मोठ्या प्रमाणावर प्लेसमेंट वाढवण्यात आली आहे. यामुळे संबंधित कालावधीत मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडू शकते. ओपन फार्मर्सनी वरील बाब लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे. वाढत्या मागणीसमोर चांगल्या गुणवत्तेच्या पिलांचा तुटवडा आहे. एकूणच पोल्ट्री उद्योगाने सावधगिरीने प्लेसमेंट वाढवली पाहिजे.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की पोल्ट्रीशेडमध्ये साचलेला माल आणि घटती मागणी यामुळे महाराष्ट्रातील बाजारात जोरदार पडझड झाली आहे. एकूणच श्रावणात विक्री मोठ्याप्रमाणावर घटली. तथापि, योग्य नियोजनामुळे श्रावणातील सरासरी विक्री दर ६२ दरम्यान निघेल. दक्षिण भारतातील बाजारभाव स्थिर असून, बंगळुरू ६२, तर हैदराबादेत ६७ रुपये प्रतिकिलो लिफ्टिंग रेट्स आहेत. चालू आठवड्यात बाजारभावात वाढ अपेक्षित आहे.

खडकेश्वर हॅचरिचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले, की श्रावण संपल्यामुळे शनिवारचे लिफ्टिंग चांगले होते. रविवारी शहरी भागातील चिकनची किरकोळ विक्री सुधारली. मात्र, ग्रामीण भागात बैलपोळ्यामुळे खपात घट दिसेल. सध्या बाजारात अडीच किलोच्यावरील पक्ष्यांची उपलब्धा असली, तरी मागणी-पुरवठा संतुलित नियोजनामुळे संख्यात्मक पुरवठा कमी राहील. त्यामुळे ओपन फार्मर्सनी पॅनिक सेलिंग करू नये. शेजारी राज्यांच्या चालू आठवड्यात आधारामुळे ५५ ते ५७ रुपये प्रतिकिलोची भावपातळी दिसू शकेल.

या दरम्यान हॅचिंग एग्जच्या मागणीत जोरदार वाढ दिसत आहे. एका दिवसाच्या पिलांचे रेट्सही वधारले असून, तुलनेने पुरवठा कमी आहे. आठवडाभरात टेबल एग्ज बाजारभावात प्रतिशेकडा २५ रु. ने सुधारणा झाली आहे. पुढील आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत असल्याने महाराष्ट्रात खप पुन्हा कमी राहील.  

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर  ५४  प्रतिकिलो  नाशिक
चिक्स २९ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २२ प्रतिनग मुंबई
अंडी  ३२५ प्रतिशेकडा   पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com