agriculture news in Marathi, pomegranate associations session from Saturday in Pune, Maharashtra | Agrowon

पुण्यात शनिवारपासून डाळिंब संघाचे अधिवेशन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

सोलापूर ः अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाच्या वतीने पुण्यात येत्या शनिवारी (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) दोनदिवसीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘अडचणीच्या काळातील शाश्‍वत डाळिंब शेती’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी दिली.

सोलापूर ः अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाच्या वतीने पुण्यात येत्या शनिवारी (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) दोनदिवसीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘अडचणीच्या काळातील शाश्‍वत डाळिंब शेती’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी दिली.

पुण्यातील बाजार समिती परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्‍घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर असतील. त्याशिवाय अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जैन इरिगेशन सिस्टिमचे अध्यक्ष अशोक जैन आणि ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ कॅथल डेन्स हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डाळिंब संघाबरोबर महाराष्ट्र फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ, जैन इरिगेशन सिस्टिम्स, सोलापूरचे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने हे अधिवेशन होत आहे. 

दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्‍घाटनाच्या मुख्य सत्रानंतर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवाद होणार असून, त्यात विविध तांत्रिक सत्रे होणार आहेत. सलग दोन दिवसांच्या या तांत्रिक सत्रात जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, डाळिंब विक्री व्यवस्थापनातील संधी व आव्हाने, डाळिंबासाठी अन्नद्रव्याचा वापर, निर्यात आणि प्रक्रिया उद्योग या अनुषंगाने तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या परिसंवादात सहभागासाठी संघाच्या सभासदांना ५०० रुपये शुल्क असून, अन्य शेतकऱ्यांसाठी १००० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी व्यवस्थापक मारुती बोराटे - ७५८८५९२८९१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

डाळिंबरत्न पुरस्कार आणि प्रदर्शन
डाळिंब उत्पादक संघाच्या वतीने दरवर्षी डाळिंब उत्पादनवाढ, मार्केटिंग, प्रक्रिया, निर्यात यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना डाळिंबरत्न पुरस्कार देण्यात येतो. त्याशिवाय याच अनुषंगाने भरीव काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचाही डाळिंबरत्न सन्मानाने गौरव करण्यात येतो. या पुरस्कारांचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते या अधिवेशनात होणार आहे. त्याशिवाय डाळिंबासंबंधीचे प्रदर्शनही याठिकाणी आयोजिण्यात आले आहे, असे अध्यक्ष श्री. जाचक यांनी स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक...
बळी ः अफवांचे अन्‌ अनास्थेचेहीधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात राईनपाडा...
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटपऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
बोंड अळी, तुडतुड्यामुळे नुकसानग्रस्त...नागपूर : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे...
दुध आंदोलनाची धग कायमपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ...
दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची...नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा...
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा...नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार...
पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे...पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू...
नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे...
वैविध्यतेने नटलेली १३ एकरांवरील...लातूर जिल्ह्यातील अजनसोंडा (बु.) (ता. चाकूर)...
वीस गुंठ्यांत ‘एक्साॅटीक' भाजीपाला...जालना जिल्ह्यातील साष्टे पिंपळगाव येथील...