agriculture news in marathi, pomegranate cultivation in Banana belt, AGROWON, maharashtra | Agrowon

केळी पट्ट्यात बहरतेय डाळिंब
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

केळीची लागवड आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत. मात्र, सततच्या नुकसानीसह अनेक जोखीमा आहेत. यामुळे आमच्या भागात डाळिंबाला काही शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
- सुनील वामन महाजन, शेतकरी, केऱ्हाळे, जि. जळगाव

जळगाव : लागवड खर्चासह इतर बाबींवर खर्च वाढल्याने जिल्ह्याच्या केळी पट्ट्यात आता शेतकरी डाळिंब लागवडीवर भर देऊ लागले आहेत. परिणामी केळीखालील लागवड क्षेत्र तीन हजार हेक्‍टरने कमी झाले आहे. यंदा येथे सुमारे 42 हजार हेक्‍टरवर केळीची लागवड झाली आहे. यापूर्वी लागवडीखालील क्षेत्र जवळपास 45 हजार हेक्‍टरपर्यंत असायचे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

कमी पाणी आणि हलक्‍या जमिनीतील फळपीक अशी ओळख असलेल्या डाळिंबाच्या लागवडीकडे मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रावेर, यावल, भडगाव, चोपडा या केळीची लागवड करणाऱ्या प्रमुख तालुक्‍यांमध्ये ही परिस्थिती आहे. जिल्हाभरात जवळपास अडीच हजार हेक्‍टरवर डाळिंब आहे. दुसऱ्या बाजूला केळीखालील क्षेत्र जवळपास तीन हजार हेक्‍टरने कमी झाले आहे.

केळीचे सरासरी क्षेत्र मागील तीन वर्षांत 42 ते 43 हजार हेक्‍टरपर्यंतच राहिले आहे. रावेर तालुक्‍यात सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्ये डाळिंबाचे पीक वाढले आहे. यावलमध्ये 600 हेक्‍टर, रावेर 500 हेक्‍टर, चोपडा 200 हेक्‍टर, जळगाव 300 हेक्‍टर, भडगाव 200 हेक्‍टर, जामनेर 200 हेक्‍टरवर डाळींबाचे क्षेत्र आहे. इतर तालुक्‍यांमध्येही कमी अधिक प्रमाणात डाळिंबाची लागवड झाल्याची माहिती मिळाली.

डाळिंब कमी पाण्यात, मुरमाड, डोंगराळ, हलक्‍या जमिनीचे पीक असून राज्यातील अनेक भागांत ते दिसत आहे. ज्यांच्याकडे अधिक शेती आहे त्यांना डाळिंबाकडे वळायला हरकत नाही, असे जळगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख  डॉ. हेमंत बाहेती यांनी म्हटले आहे.

केळीखालील क्षेत्र कमी होण्याची कारणे

  • केळीला अपेक्षित दर न मिळणे
  • कापणीला होणारा विलंब
  • कमी दरातील खरेदी
  • वादळ, गारपीट, उष्णतेमुळे होणारे नुकसान
  • खते, पाण्याचे काटेकोर नियोजन

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...