agriculture news in marathi, pomegranate garden broke, nashik, maharashtra | Agrowon

भरपाई न मिळाल्याने नैताळे येथील शेतकऱ्याने डाळिंब बाग तोडली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
निफाड, जि. नाशिक  : तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून नैताळे येथील शेतकरी भागवत बोरगुडे यांनी भगवा जातीच्या डाळिंबाचे रोप खरेदी केले होते; मात्र हे रोप बोगस निघाल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यांनी नाशिक येथील ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यांच्या बाजूने निकाल लागूनही त्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर त्यांनी आपली बाग जेसीबी मशिनने काढून टाकली आहे.
 
निफाड, जि. नाशिक  : तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून नैताळे येथील शेतकरी भागवत बोरगुडे यांनी भगवा जातीच्या डाळिंबाचे रोप खरेदी केले होते; मात्र हे रोप बोगस निघाल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यांनी नाशिक येथील ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यांच्या बाजूने निकाल लागूनही त्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर त्यांनी आपली बाग जेसीबी मशिनने काढून टाकली आहे.
 
कृषी विभागाच्या पिंपळगाव बसवंत येथील रोपवाटिकेतून २०१२ मध्ये डाळिंब लागवडीसाठी जवळपास १४० शेतकऱ्यांनी रोपे खरेदी केली होती. खरेदी केलेल्या वाणामध्ये भगवाऐवजी इतर जंगली जातींचा समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. नैताळे येथील भागवत बोरगुडे यांनी शासनावर संताप व्यक्त करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.
 
या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व बोगस रोपामुळे उत्पादनात लाखो रुपयांचा तोटा झाल्याने भरपाई मिळावी, या मागणीसाठी त्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे धाव घेतली. न्याय मंचाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. दोषी अधिकाऱ्यांनी तक्रारदार शेतकऱ्याला तीन लाख रुपये भरपाई द्यावी, तसेच १० डिसेंबर २०१४ पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत दसादशे१० टक्के प्रमाणे व्याज अदा करावे, तसेच तक्रारदाराच्या मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये, तर अर्ज व इतर खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावेत, असा निकाल दिला होता;
 
मात्र हा निकाल कृषी विभागाने झुगारून दिला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अपील केले आहे. दरम्यान, या सर्व शासकीय गोंधळनाने संतापलेल्या बोरगुडे यांनी जेसीबी मशिनने डाळिंब बाग काढून टाकली आहे.

इतर ताज्या घडामोडी
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...