agriculture news in marathi, Pomegranate hand blossom: Gore | Agrowon

डाळिंबासाठी धरा हस्त बहर : गोरे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

सोलापूर : ‘‘डाळिंबाची बाग चांगली आणण्यासाठी वर्षभर बागेमध्ये काम करावे लागते; पण गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवायची असल्यास डाळिंबाचा हस्त बहार धरल्यास तो फायदेशीर ठरतो``, असे मत संगमनेर येथील अभ्यासक, डाळिंबतज्ज्ञ बाबासाहेब गोरे यांनी शुक्रवारी (ता.५) येथे व्यक्त केले.

‘सकाळ-ॲग्रोवन'तर्फे आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी ‘शाश्‍वत डाळिंब शेती तंत्रज्ञान'' या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गोरे बोलत होते. ‘ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण या वेळी उपस्थित होते.

सोलापूर : ‘‘डाळिंबाची बाग चांगली आणण्यासाठी वर्षभर बागेमध्ये काम करावे लागते; पण गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवायची असल्यास डाळिंबाचा हस्त बहार धरल्यास तो फायदेशीर ठरतो``, असे मत संगमनेर येथील अभ्यासक, डाळिंबतज्ज्ञ बाबासाहेब गोरे यांनी शुक्रवारी (ता.५) येथे व्यक्त केले.

‘सकाळ-ॲग्रोवन'तर्फे आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी ‘शाश्‍वत डाळिंब शेती तंत्रज्ञान'' या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गोरे बोलत होते. ‘ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण या वेळी उपस्थित होते.

गोरे म्हणाले, ‘‘डाळिंबाचे पीक घेताना त्याचा उत्पादन खर्च न वाढू देण्याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागते. डाळिंबामध्ये तेलकट डागाची मोठी समस्या आहे. त्यावर अद्यापही कोणत्याच प्रकारचे औषध निघाले नाही. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनाही त्या रोगावरील औषध सापडले नाही. मात्र, तरीही अनेक शेतकरी तेलकट डाग रोगाबाबतची महागडी औषधे आणून फवारतात; पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. झाडावरील माल काढून घेतल्यानंतर झाडाला मोठ्या प्रमाणात खाद्याची गरज असते. त्या वेळी झाडाला खाद्य देणे आवश्‍यक आहे.``

झाडाच्या १२ महिन्यांच्या पाच अवस्था असतात. त्याविषयी गोरे म्हणाले, ‘‘पहिली अवस्था स्टोरेजची आहे. दुसरी विश्रांतीची, तिसरी फुले आणि फळधारणा, चौथी फळांच्या विकासाची; तर पाचवी आकार व रंग चांगला येणे, अशाप्रकारच्या पाच अवस्थांच्या माध्यमातून डाळिंबाचे पीक जात असते. कोणत्या अवस्थेमध्ये काय काळजी घ्यावी, हे शेतकऱ्यांना समजले पाहिजे. ज्या ठिकाणी डाळिंबाच्या पांढऱ्या मुळ्या चांगल्या आहेत, तिथपर्यंत पाणी देणे गरजेचे आहे. झाडाला ज्या प्रमाणात पाने आहेत, त्या प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन करावे. वाफसा परिस्थिती निर्माण झाल्यानंतर झाडाला टाकलेले खते उपलब्ध होतात,`` असेही गोरे यांनी सांगितले.

आदिनाथ चव्हाण यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. ‘ॲग्रोवन`चे बातमीदार सुदर्शन सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...