Agriculture News in Marathi, Pomegranate production seen down, Sangli District | Agrowon

सांगली जिल्ह्यात डाळिंब उत्पादन घटण्याची चिन्हे
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017
सांगली ः मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागली आहेत. यामुळे उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याची शक्‍यता आहे.
 
जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्‍टरहून अधिक डाळिंब क्षेत्र आहे. आटपाडी, तासागाव, जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत पाणीटंचाई कायमस्वरूपाची आहे. सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणी देऊन डाळिंबाच्या बागा जगवल्या आहेत.
 
सांगली ः मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागली आहेत. यामुळे उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याची शक्‍यता आहे.
 
जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्‍टरहून अधिक डाळिंब क्षेत्र आहे. आटपाडी, तासागाव, जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत पाणीटंचाई कायमस्वरूपाची आहे. सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणी देऊन डाळिंबाच्या बागा जगवल्या आहेत.
 
सिंचन योजनेचे पाणी शिवारात आल्याने काही प्रमाणात पाणीटंचाई दूर झाली. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. शेतकऱ्यांनी चांगले वातावरण म्हणून जून-जुलै महिन्यांत बागांची छाटणी घेतली. ऑगस्ट महिन्यात औषध फवारणी, मशागतीची कामे केली व बहर धरला. पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरणामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला.
 
यामुळे बाधित झालेली डाळिंब काढून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यातूनही शेतकरी सावरले. मात्र सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यांतील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत आला. काही ठिकाणी बागामध्ये फुलकळीची मोठ्या प्रमाणात गळ झाली. सध्या विक्रीला आलेली डाळिंब पिके कुजू लागली आहेत.
 
कितीही औषध फवारणी करुनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना कुजलेली डाळिंबे काढण्यासाठी मजुरीचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यात सध्या डाळिंबाचे दर अत्यंत कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
 
नोव्हेंबर महिन्यात फळांची विक्री सुरू होते. परतीच्या पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. रात्रंदिवस कष्ट करून शेतकऱ्यांनी बागा जोमात वाढविल्या. मात्र दर अत्यंत कमी सुरू असल्याने, बागेचा खर्च तरी निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. 
 
आटपाडी तालुक्‍यात अधिक फटका 
आटपाडी सर्वाधिक क्षेत्र आटपाडी तालुक्‍यात आहे. या तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकरी मृग बहर घेतात. गेल्या वर्षीदेखील पावसाने मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे नुकसान झाले होते. यामुळे यंदा तिच परिस्थिती राहणार का, अशी चर्चा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांत होती. मात्र सुरवातीला पावसाने दांडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.
 
तालुक्‍यात यंदा परतीच्या पावसाने थैमान घातले. त्यामुळे बहरलेली डाळिंबाच्या बागा पावसामुळे धोक्‍यात आल्या. तालुक्‍यात सुमारे २५ ते ३० टक्के घट होण्याची शक्‍यता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

इतर ताज्या घडामोडी
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...
नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...
सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...
डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...