agriculture news in Marathi, Pomegranate per quintal 450 to 7000 rupees in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ४५० ते ७००० रुपये
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 जून 2019

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५८७६ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ३२५० व मृदुला वाणास ५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५८७६ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ३२५० व मृदुला वाणास ५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. टोमॅटोला १०० ते  ५५०,  वांगी  १३०  ते  ३५०,  फ्लॉवर ८० ते  १७० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी  ६५  ते १८५ असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची  १५० ते २०० प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा  ५०  ते  २००,  कारले  ४०० ते  ५५०,  गिलके  २००  ते  ४००,  भेंडी  १२० ते  ३००  असे प्रति १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला  १५०  ते  ३००,  लिंबू  ५०० ते  ९००,  दोडका  ४३० ते  ७००  असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

हिरव्या मिरचीची आवक २२२१ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली. तसेच परपेठेत मागणी वाढल्याने असल्याने बाजारभावात वाढ झाली. लवंगी मिरचीला ५०००  ते ६००० तर ज्वाला मिरचीला ४००० ते ६००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला.  वालपापडी घेवड्याची आवक  २१२३ क्विंटल झाली. आवक कमी झाल्याने व परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ  झाली.  वालपापडीला प्रतिक्विंटल  ३००० ते ४००० दर मिळाला. तर घेवड्याला ६५००   ते  ७०००  प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक  ७८४४   क्विंटल झाली. त्यास  ११०० ते  २२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. भुईमुगाच्या शेंगांची आवक ९२१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० असा दर मिळाला. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ६०० ते  ३४००,  मेथी १७०० ते  ४०००,  शेपू  १२०० ते  २४००,  कांदापात १२५० ते  ५१००,  पालक २१० ते ४००,  पुदिना १८० ते  ३००  असे दर प्रति १०० जुड्यांना मिळाले.  उन्हाळ कांद्याची आवक  २३३१० क्विंटल झाली. बाजारभाव  ३५०  ते  १३५० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक  ८६३३ क्विंटल झाली. बाजारभाव  ६५०   ते  १२०० प्रतिक्विंटल होते.

फळांमध्ये  चालू सप्ताहात आंब्याची आवक २४२८ क्विंटल झाली. लालबाग २५०० ते ४५०० प्रतिक्विंटल, बदाम आंब्यास ३००० ते ५००० प्रतिक्विंटल तर केशर आंब्यास ४५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजाची आवक ४७६० क्विंटल झाली. बाजारभाव ४०० ते १००० प्रतिक्विंटल मिळाला. खरबुजाची आवक ४५५ क्विंटल झाली. बाजारभाव ९०० ते २४०० प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक १०० क्विंटल झाली. बाजारभाव १८०० ते ४५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक २८० क्विंटल झाली.बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...