सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी

डाळीेंब
डाळीेंब

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाच्या दरात चांगलीच तेजी आली. डाळिंबाची आवकही तशी जेमतेम राहिली, पण मागणी चांगली असल्याने दरातील तेजी टिकून राहिली. डाळिंबाला प्रतिकिलो कमाल ९० रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाची आवक रोज ६०० ते १५०० क्विंटलपर्यंत राहिली. जिल्ह्यातूनच सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ या भागांतून डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. नजीकच्या उस्मानाबाद, सांगली भागांतूनही काही प्रमाणात आवक झाली, पण ती फारशी नव्हती. डाळिंबाच्या खरेदीसाठी आंध्रसह दिल्ली आणि कोलकाता भागांतूनही खास व्यापारी येथे येत आहेत. सध्या हंगाम चांगला सुरू आहे. याआधी दोन आठवड्यांपूर्वी डाळिंबाच्या दराने एकदमच नीचांकी पातळी गाठली होती, पण गेल्या काही दिवसांत त्याला मागणीही वाढली आहे आणि दरही चांगले मिळत आहेत. डाळिंबाला प्रतिकिलोसाठी १५ ते ९० सरासरी २४ रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात काही किरकोळ १०-२० रुपयांचा फरक वगळता दरातील तेजी टिकून राहिली. डाळिंबाशिवाय द्राक्ष, लिंबालाही मागणी वाढत आहे. त्यांची आवकही चांगली राहिली. स्थानिक भागातूनच ही आवक राहिली. लिंबाची आवक रोज २० ते ३० क्विंटल राहिली. लिंबाला प्रतिदहा किलोसाठी २० ते ५० रुपये असा राहिला. द्राक्षाचीही ५ ते १० क्विंटलपर्यंत रोजची आवक होती. द्राक्षाला चार किलोच्या पेटीला ८० ते १३५ रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दरात या सप्ताहात पुन्हा काहीशी सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला २०० ते २३०० व सरासरी १००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण भाज्यांची आवक ५ ते १० हजार जुड्यांपर्यंत रोज राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. कोथिंबिरीला शंभर जुड्यांसाठी १०० ते ४०० रुपये, मेथीला ५० ते २५० रुपये, शेपूला ३५० ते ७०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com