agriculture news in Marathi, pomegranate rates increased in solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी
सुदर्शन सुतार
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाच्या दरात चांगलीच तेजी आली. डाळिंबाची आवकही तशी जेमतेम राहिली, पण मागणी चांगली असल्याने दरातील तेजी टिकून राहिली. डाळिंबाला प्रतिकिलो कमाल ९० रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाच्या दरात चांगलीच तेजी आली. डाळिंबाची आवकही तशी जेमतेम राहिली, पण मागणी चांगली असल्याने दरातील तेजी टिकून राहिली. डाळिंबाला प्रतिकिलो कमाल ९० रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाची आवक रोज ६०० ते १५०० क्विंटलपर्यंत राहिली. जिल्ह्यातूनच सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ या भागांतून डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. नजीकच्या उस्मानाबाद, सांगली भागांतूनही काही प्रमाणात आवक झाली, पण ती फारशी नव्हती. डाळिंबाच्या खरेदीसाठी आंध्रसह दिल्ली आणि कोलकाता भागांतूनही खास व्यापारी येथे येत आहेत. सध्या हंगाम चांगला सुरू आहे.

याआधी दोन आठवड्यांपूर्वी डाळिंबाच्या दराने एकदमच नीचांकी पातळी गाठली होती, पण गेल्या काही दिवसांत त्याला मागणीही वाढली आहे आणि दरही चांगले मिळत आहेत. डाळिंबाला प्रतिकिलोसाठी १५ ते ९० सरासरी २४ रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात काही किरकोळ १०-२० रुपयांचा फरक वगळता दरातील तेजी टिकून राहिली. डाळिंबाशिवाय द्राक्ष, लिंबालाही मागणी वाढत आहे. त्यांची आवकही चांगली राहिली. स्थानिक भागातूनच ही आवक राहिली.

लिंबाची आवक रोज २० ते ३० क्विंटल राहिली. लिंबाला प्रतिदहा किलोसाठी २० ते ५० रुपये असा राहिला. द्राक्षाचीही ५ ते १० क्विंटलपर्यंत रोजची आवक होती. द्राक्षाला चार किलोच्या पेटीला ८० ते १३५ रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दरात या सप्ताहात पुन्हा काहीशी सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला २०० ते २३०० व सरासरी १००० रुपये असा दर मिळाला.

सर्वसाधारण भाज्यांची आवक ५ ते १० हजार जुड्यांपर्यंत रोज राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. कोथिंबिरीला शंभर जुड्यांसाठी १०० ते ४०० रुपये, मेथीला ५० ते २५० रुपये, शेपूला ३५० ते ७०० रुपये असा दर मिळाला.

इतर बातम्या
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन...पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
सांगली जिल्ह्यात १४ हजार शेतकरी वीज...सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
अकोला जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना...अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
रब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणीसातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...